शिरपूर : अल्पवयीन मुलीचा विवाह करून देणाऱ्या आई-वडिलांसह तिच्या पतीविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मुलगी प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली.
जळोद (ता. शिरपूर) गावाजवळ उखळवाडी या वस्तीत मुलीचे माहेर आहे. तिचे वय विवाहयोग्य नसतानाही तिच्या आई-वडिलांनी मुखेड (ता. शिरपूर) येथील आनंद ठाणसिंह भिल याच्याशी २०२१ मध्ये तिचा विवाह करून दिला होता. (From case of child marriage born one child case registered against three Dhule News)
लग्नानंतरच्या संबंधातून ती गरोदर राहिली. तिचा पती ऊसतोड मजूर असल्यामुळे तो तिला घेऊन पुणे जिल्ह्यात गेला. प्रसूतीवेदना होऊ लागल्यामुळे तिला २३ डिसेंबरला पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिने बालकास जन्म दिला. दरम्यान, तिच्या वयाबाबत शंका आल्याने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चौकशी केली.
ती अल्पवयीन असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना त्याबाबत माहिती दिली. त्यांनी रुग्णालयात जाऊन तिचा जबाब नोंदवून घेतला. त्यावरून तिचा पती आणि आई-वडील यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. तेथून तो गुन्हा शिरपूर शहर पोलिसांत वर्ग करण्यात आला. त्यानंतर पती आनंदसिंह भिल, वडील सुरेश भिल व आई सुंदरबाई भिल यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. उपनिरीक्षक संदीप मुरकुटे तपास करीत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.