Dhule Crime News : आंबा फुकट न दिल्याने फळविक्रेत्यावर हल्ला

Fruit seller attacked for not giving free mangoes dhule crime news
Fruit seller attacked for not giving free mangoes dhule crime newsesakal
Updated on

Dhule Crime News : शहरात फुकट आणि मोठा आंबा खाण्यास दिला नाही याचा राग येऊन दोघांनी धारदार हत्याराने हल्ला करून फळविक्रेत्याला जखमी केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली.

या प्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Fruit seller attacked for not giving free mangoes dhule crime news)

शहरातील कोळीवाडा, गांधी चौकमधील रहिवासी वामन भटू खैरनार (वय २९) व त्याचा मित्र देवाजी जिवल्या वळवी याचे भागीदारीत शहरातील हॉटेल विजयानंदसमोर फळ विक्रीचे दुकान आहे. दुकानावर आंब्याची विक्री करीत असताना त्याच्या दुकानावर दोन अनोळखी आले.

त्यांनी पैसे न देता आंबे खाण्यास मागितले. दुकानदाराने त्यांना आंबे दिले असता लहान आंबा का दिला, मोठा दे, असे म्हणत आंबा फेकून दिला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Fruit seller attacked for not giving free mangoes dhule crime news
Dhule Crime News : मद्य तस्कर दिनू डॉनचा नेपाळलाही व्यवसाय! चौकशीदरम्यान माहिती समोर

नंतर त्यांना मोठा आंबा दिला. परंतु तू आम्हाला जास्त पिकलेला आंबा दिला, असे म्हणून तू आम्हाला ओळखत नाही, असे म्हणून दोघांनी शिवीगाळ करीत त्याच्या हातातील पिशवीने डोक्यावर जोरात मारले.

पिशवीतील धारदार हत्यार जोरात लागल्याने रक्तस्राव होऊ लागला. जखमीचा मित्र देवाजीने त्यांच्या हातातील पिशवी घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यालादेखील शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व पळून गेले. त्यांचा शोध पिंपळनेर पोलिस घेत आहेत.

Fruit seller attacked for not giving free mangoes dhule crime news
Dhule Crime News : तो करत होता चक्क चोरीच्या दुचाकीची विक्री OLXवर अन....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.