Dhule Fraud Crime : दहिवेल येथील अजय शिवाजी पाटील यांना यांच्या विमा पॉलिसी फसवणूक प्रकरणातील माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये दाखल गुन्ह्यातील पाच आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले असून, यासोबतच एक लाख २७ हजारांची बँक खात्यातील रक्कम व सहा मोबाईलदेखील हस्तगत करण्यात आले आहेत. (Fugitive suspect in fraud case 5 tadipaar dhule crime news)
या प्रकरणात मुख्य सूत्रधार प्रल्हाद गजानन वाठोडकर ऊर्फ संतोष वामन भोसले, पॉलिसी एजंट अविनाश हनुमंत वांगडे (रा. लोकमान्यनगर, ठाणे), बनावट बँक खातेधारक शिवम राजू जयस्वाल (रा. पिसवली कल्याण), पॉलिसीचा डाटा माहिती पुरविणारा सागर विजय माळी (रा. गोळेगाव, ता. जुन्नर, जि. पुणे), बनावट बँक खातेधारक विवेक विनोद सिंग (रा. पिसवली, कल्याण) यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
फिर्यादी अजय पाटील (रा. दाहिवेल) यांना संशयित आरोपींनी एका फायनान्स कंपनीचा अकाउंट मॅनेजर आहे, असे सांगून श्री. पाटील यांना कंपनीची विमा पॉलिसी घेतल्यास फिर्यादी व साक्षीदार यांना शून्य टक्के दराने प्रत्येकी ५० लाख रुपये कर्ज मंजूर करून देतो व हे कर्ज दर वर्षी पाच लाख याप्रमाणे दहा वर्षांत परतफेड करायचे आहे, असे आम्हीच दाखवून कर्ज मंजूर झाले आहे.
याबाबतचे बनावट पॉलिसीचे कागदपत्र देऊन श्री. पाटील व साक्षीदार यांना एकूण नऊ लाख ९९ हजार ३०० रुपयांची फसवणूक केली, असा गुन्हा धुळे येथील सायबर पोलिस ठाण्यात दाखल होता.
गुन्ह्याचा तपास सायबर पोलिस ठाण्याकडे सुरू असताना तक्रारदाराचे ज्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर झाले आहेत ते बँक खाते गोठविण्यात आले. त्यानंतर तांत्रिक तपासातून आरोपींची माहिती गोळा करण्यात आली. तांत्रिक पुराव्यानुसार आरोपी ठाणे, कल्याण, मुलुंड, मुंबई अशा मोठ्या शहरांतील असल्याबाबतची माहिती मिळविण्यात आली. त्यानुसार सायबर पोलिस ठाण्यातून एक अधिकारी व कर्मचारी यांचे तपासपथक तयार करून त्यांना आरोपींचा शोध घेण्यास रवाना केले.
तपासपथकाने तांत्रिक विश्लेषणानुसार संशयिताचा शोध घेऊन कल्याण येथील दाट वस्तीत फिरून पिसवली गावातून विवेक विनोद सिंग, शिवम राजू जयस्वाल यांना १ जानेवारीला ताब्यात घेऊन धुळे येथे आणले. त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्यांच्याकडून गुन्ह्यातील सूत्रधार प्रल्हाद वाठोडकर याच्या नावाचा उलगडा झाला. तांत्रिक पुराव्यानुसार त्याची माहिती काढून तो कल्याण येथून नाशिकमार्गे शिर्डी येथे पळून गेल्याची माहिती मिळाली.
माहितीनुसार नाशिक येथे तपासपथक रवाना करून नाशिक येथे तपास करीत असताना तो शिर्डी येथे प्रसार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर शिर्डी येथे रात्रभर फिरून तपास केल्यानंतर २ जानेवारीला पहाटे चारला शिर्डी येथे त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला तिथून धुळे येथे आणल्यानंतर त्याचा साथीदार अविनाश वांगडे याच्याबाबत विचारपूस केली असता ठाणे येथील वर्तकनगर भागातील चाळीत राहत असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर त्यांनी दिलेल्या पत्त्यानुसार व तांत्रिक विश्लेषणातून तपासपथक ठाणे येथे रवाना झाले व ६ जानेवारीला पहाटे अविनाश वांगडे याला ताब्यात घेण्यात आले. सागर माळी कल्याण येथून पळून गोळेगाव (जि. पुणे) येथे प्रसार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास ९ जानेवारीला पहाटे तपासपथकाने ताब्यात घेऊन धुळे येथे आणले. अशा प्रकारे या प्रकरणातील पाच आरोपींना ताब्यात घेण्यात पथकाला यश मिळाले आहे.
आरोपींना पोलिस कोठडी मिळाली असून, या गुन्ह्यात आणखीन सहभाग असणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी हृषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक धनंजय पाटील, उपनिरीक्षक कोठुळे, जगदीश खैरनार, भूषण खलाणेकर, राजेंद्र मोरे.
अमोल पाटील, दिलीप वसावे, तुषार पोतदार, प्रसाद वाघ, प्रीतेश चौधरी, सुभाष वळवी, हेमंत बागले, चेतन सोनगिरे, विवेक बिलाडे, अमितेश पाटील, मनीषा वाघ, रेवती बिलाडे, प्रियंका देवरे, सोनाली श्रीखंडे, मृणाली भावसार या पथकाने केली. गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.