Dhule News : हद्दवाढ गावासाठी २५ कोटी मंजूर; वलवाडीचा होणार विकास

fund
fundsakal
Updated on

Dhule News : महापालिका हद्दवाढ क्षेत्रातील पायाभूत विकासासाठी पहिल्या टप्प्यात २५ कोटींचा निधी मंजूर करून आणण्यात यश आल्याची माहिती खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.

याकामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. मंजूर निधीतून वलवाडी भागात विकासकामे होतील, असेही डॉ. भामरे यांनी सांगितले.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

महापालिका क्षेत्राच्या हद्दवाढीत नगाव अंशतः ११ गावे जोडण्यात आली. या गावांतील पायाभूत सुविधा आणि विकासासाठी महापालिकेच्या माध्यमातून १२१ कोटींचा निधी देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर झाला.

महापौर प्रतिभा चौधरी, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, भाजपचे माजी शहर-जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, विद्यमान शहर-जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी हद्दवाढ भागातील विकासकामांसाठी दिलेला १२१ कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर करावा, अशी आग्रही मागणी केली. त्यानुसार १२१ कोटींच्या प्रस्तावापैकी पहिल्या टप्प्यात २५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

fund
Dhule Congress News : भाजपवरची नाराजी ‘कॅच’ करणार? आगामी निवडणुकांत पाटील पिता-पुत्राने मोट बांधण्याची अपेक्षा

राज्य सरकारकडून प्राप्त पहिल्या टप्प्यातील २५ कोटींचा निधी हद्दवाढ गावांमधील वलवाडी परिसराच्या विकासासाठी मंजूर झाला आहे.

उर्वरित निधी लवकरच मंजूर केला जाईल, असे सांगत डॉ. भामरे यांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले.

fund
Dhule News: दोंडाईचा पोलिस ठाण्याचा झाला कायापालट..!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()