Dhule News : पाच लाखांचा निधी तीन वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आल्यानंतरही स्मशानभूमीचे काम सुरूही झाले नसल्याचा धक्कादायक प्रकार नवागाव (ता. शिरपूर) येथे उघडकीस आला आहे. स्मशानभूमीअभावी उन्हापावसात मृतदेहांची विटंबना होत असल्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. (fund of 5 lakhs was sanctioned 3 years ago but work of cemetery has not started shirpur dhule news)
नवागाव येथील रहिवासी जितेंद्र पावरा यांनी या गैरप्रकाराला वाचा फोडली आहे. बुडकी (ता. शिरपूर) ग्रामपंचायतींतर्गत नवागाव येते. पाड्याच्या स्वरूपात असलेल्या नवागावला स्वत:ची स्मशानभूमी नव्हती.
याबाबत ग्रामस्थांनी वारंवार तगादा लावल्याने २०२१ मध्ये स्मशानभूमीच्या कृती आराखड्याला मंजुरी देण्यात आली. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून स्मशानभूमी तयार करण्यासाठी पाच लाख २२ हजार रुपयांचा निधीही शासनाने मंजूर केला. मात्र अद्यापपर्यंत बांधकामाला सुरवात झालेली नाही.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
जितेंद्र पावरा यांनी स्मशानभूमीचे काम तातडीने सुरू करण्याबाबत वारंवार पाठपुरावा केला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. स्मशानभूमीअभावी ग्रामस्थांना उन्हाळा आणि पावसाळ्यात उघड्यावर मृतांवर अंत्यसंस्कार करावे लागतात. विशेषत: पावसाळ्यात मृतदेहांची विटंबना होते. पावसात चिता विझत असल्याने मृतदेहांवर वारंवार अग्निसंस्कार करावे लागतात.
त्यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे. तांत्रिक मान्यता, निधी मंजूर अशी परिस्थिती असतानाही नवागावला स्मशानभूमीपासून वंचित ठेवण्याचे कारण काय, असा प्रश्न जितेंद्र पावरा यांनी उपस्थित केला असून, तातडीने कार्यवाही न झाल्यास ग्रामस्थांच्या सहकार्याने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.