Ganesh visarjan 2023 : अनंत चर्तुर्थी निमित्त शेवटच्या टप्यातील २१७ गणेश मंडळांनी लाडक्या बाप्पाची जल्लोषात विसर्जन मिरवणुक काढून तासन् तास नाचत निरोप दिला.
हजारो क्विंटल गुलालाची उधळण करीत गणपता बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या चा जयघोष करीत निरोपासोबतच पुढील वर्षी लवकर येण्याची आर्त हाकही गणेश भक्तांनी दिली.
जिल्ह्यात १९ सप्टेबरला पारंपारिक ढोल -ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करीत विविध रोषणाई व देखावा उभारत गणेश मंडळांनी लाडक्या बाप्पाचे जल्लोषात स्वागत करीत गणेश मूर्तींची स्थापना केली होती. (Ganesh Visarjan 2023 Farewell to Beloved Bappa with Thousands of Quintals of Gulal nandurbar)
त्यानंतर दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस,सात दिवस ,नऊ दिवस असे जिल्हाभर गणेश मंडळांनी लाडक्या बाप्पाची स्थापना करून विसर्जन केले. काल अनंत चतुर्थी म्हणजे शेवटचा दिवस.
या दिवशी शहरातील शतकोत्तर पंरपरा असलेले मानाचे दादा-बाबा गणपतींसह शकडो गणेश मंडळे, तालीम, व्यायाम शाळांतर्फे स्थापन केलेल्या गणेश मूर्तींचे मोठ्या जल्लोषात विसर्जन करण्यात आले.
२१७ मंडळांतर्फे विसर्जन मिरवणुक
जिल्ह्यात २१७ गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुका काढल्या होत्या. नंदुरबार शहरातील मानाचे दादा-बाबा गणपतीसह सावता-फुले प्रेरित माळीवाड्याचा राजा, श्रीराम सेना मंडळ, वीर भगतसिंग गणेश मंडळ,
जय हनुमान व्यायाम शाळा, शक्ती सागर गणेश मंडळ, दत्त व्यायाम शाळा, बजरंग व्यायाम शाळा, मारूती व्यायाम शाळा, अंबिका गणेश मंडळ या मोठ्या गणेश मंडळांसोबतच अनेक मंडळांनी विसर्जन मिरवणुका काढल्या.
सकाळ आठपासून प्रत्येक मंडळाने आपापल्या सोयीने मिरवणुका काढून गणरायाला निरोप दिला. काहींनी दोन तास तर काहींना बारा-पंधरा तास नाचत हजारो क्विंटल गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.
राजकीय नेत्यांनीही धरला ठेका
दरम्यान, गणेशोत्सवातील वाद्याचा आवाज हा प्रत्येकाचे पाय थिरकावयास भाग पाडतात. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी गणपती मंदीराजवळ टेन्ट टाकून मंडळातील कार्यकर्त्यांचा सत्कार करीत मिरवणुका शांततेत पार पाडण्याचे आवाहन करीत काही मिरवणुकीमध्ये सहभागी होत कार्यकर्त्यांसह नाचण्याचा आनंद लुटला.
पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित, खासदार डॉ.हिना गावित यांनीही तूप बाजारात गणेश भक्तांचा सत्कार केला. दरम्यान खासदार डॉ. हिना गावित यांनी मानाचा बाबा गणपतीचा मिरवणुकीत महिलांमध्ये सहभागी होत बराच वेळ नाचण्याचा आनंद घेतला.
हरीहर भेट
शहरातील मानाचे दादा व बाबा गणपती यांची जळका बाजारात हरीहर भेट होते. ही १४० वर्षाची पंरपरा आजही कायम आहे. सर्व गणेश विसर्जन मिरवणुका येथे रांगेत येतात.
या दोन्ही मानाचा गणपतींचे रथ समोरा समोर येतो व एकच जल्लोष अन् उत्साह संचारतो. गणरायाचा जयघोष करीत येथे हरीहर भेट होते. आरती व प्रसाद वाटपानंतर विसर्जन मिरवणुका पुढे जातात.
या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो भाविक येथे जमतात. यावर्षी साधारण साडेअकरा वाजता रात्री ही भेट झाली.
शहर, जिल्ह्यातील गणेश विसर्जन करणारे मंडळ
नंदुरबार शहर ३७, नंदुरबार तालुका ४९ उपनगर ८ नवापूर ३२, विसरवाडी १ शहादा ४७ म्हसावद १२ सारंगखेडा १०, धडगाव ५ अक्कलकुवा ९, तळोदा ४, मोलगी २
पोलिसांचा चोख बंदोबस्त श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील व अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी, राज्य राखीव पोलिस बल, होमगार्ड, शिघ्र कृती दला, स्टायकिंग फोर्स आदींनी चोख बंदोबस्त ठेवला.
विसर्जन मिरवणुक मार्गावर ठिक-ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे लावलेले होते. मिरवणूक दरम्यान ड्रोन कॅमेऱ्यांचाही वापर करण्यात आला आहे .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.