Ganeshotsav 2023 : उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Ganeshotsav
GaneshotsavE sakal
Updated on

Ganeshotsav 2023 : शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत २०२३ च्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा होणार असून, जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत ऑनलाइन सहभाग नोंदवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे. (Ganeshotsav 2023 Award for best Ganeshotsav mandals by govt nandurbar news)

श्रीमती खत्री यांनी म्हटले आहे, की शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे स्पर्धा होणार असून, स्पर्धेत राज्यातील तीन विजेत्या गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून राज्यस्तरीय प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम पाच लाख, द्वितीय क्रमांकासाठी अडीच लाख, तृतीय क्रमांकासाठी एक लाख आणि जिल्हास्तरीय समितीने निवड केलेल्या एका विजेत्या मंडळास रोख २५ हजारांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कार्यपद्धत निश्चित करण्यात आली आहे.

स्पर्धेत, धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या व स्थानिक पोलीसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Ganeshotsav
Ganeshotsav : पर्यावरणपूरक गणेश मूर्ती खरेदी करण्याचे महापालिकेचे आवाहन

स्पर्धेत भाग घेण्यासाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांचे mahotsav.plda@gmail.com या ई- मेल वर विहित नमुन्यात ५ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत.

अर्जाचा नमुना शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या ४ जुलैच्या शासन निर्णयातील सोबतच्या परिशिष्ट ‘अ’मध्ये देण्यात आला आहे. तसेच पुरस्कारासाठी निवड करण्यासाठी कार्यपद्धत नमूद करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी https://gr.maharashtra.gov.in या संकेतस्थळवर भेट द्यावी, असेही श्रीमती खत्री यांनी नमूद केले आहे.

स्पर्धेत जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.

Ganeshotsav
Ganeshotsav 2023 : गणेशोत्सव मंडळांसाठी खुशखबर! राज्य शासनाकडून लाखोंची पारितोषिके जिंकण्याची संधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.