Ganeshotsav 2023 : ‘माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार’ स्पर्धा; जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे सहभागाचे आवाहन

Ganeshotsav 2023
Ganeshotsav 2023 esakal
Updated on

Ganeshotsav 2023 : आगामी गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार’ या विषयासंबंधी गणेशोत्सव देखावा-सजावट स्पर्धा आयोजित केली आहे.

स्पर्धेत जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे, या माध्यमातून जनतेचे प्रबोधन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे. (ganeshotsav 2023 My Ganesha festival my right to vote competition in dhule news)

दर वर्षी भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला महाराष्ट्रातील गणेशभक्तांच्या घरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणेशाचे आगमन होते आणि वातावरण चैतन्याने भरून जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात समाजप्रबोधनासाठी सुरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा महाराष्ट्र आजही जपत आहे.

याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार’ या विषयासंबंधी गणेशोत्सव सजावट-देखावा स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळे प्रबोधनपर देखावे साकार करून सार्वजनिक मंडळांच्या देखाव्यांच्या माध्यमातून मताधिकार बजावण्यासाठी मतदान नोंदणी, मताधिकारी, लोकशाहीचे सक्षमीकरण या विषयांवर प्रबोधन करतात तसेच सजावटीद्वारे सामाजिक संदेशदेखील दिले जातात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Ganeshotsav 2023
Ganeshotsav Decoration Result : 'दगडूशेठ'च्या स्पर्धेत शहरातील १०४ गणेश मंडळांना पुरस्कार जाहीर

स्पर्धेसाठी विषय

‘माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार’ स्पर्धेसाठी काही विषय निश्‍चित केले आहेत. यात ‘लोकशाही टिकवण्यासाठी मतदानाला पर्याय नाही’, ‘मतदानयादीतला तरुणाईचा टक्का वाढवा म्हणून’, ‘आम्ही मतदान करणार कारण...’ ‘हक्क वंचितांचे, मार्ग मताधिकाराचा’, ‘शहरी मतदारांची अनास्था-कारणे आणि उपाय’ आदी विषयांचा यात समावेश आहे.

दरम्यान, हे विषय सोयीसाठी असून, या विषयापलीकडेही जाऊन स्पर्धकांना देखाव्यातून संदेश देता येईल. मात्र त्यामध्ये लोकशाही, मतदान नोंदणी, मताधिकार यांचे महत्त्व अधोरेखित झाले पाहिजे. मताधिकार हा १८ वर्षांवरील नागरिकांचा कायदेशीर अधिकार आहे.

त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदारयादीत नोंदविणे आणि मताधिकार बजावणे, मतदारयादीतील दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधारकार्ड जोडणे, तसेच मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे यांसारख्या विषयांवर आपल्या देखाव्या-सजावटीतून जागृती करून लोकशाही समृद्ध करता येईल. यासारखे संदेशही देखावे व सजावटीच्या माध्यमातून देता येणार आहे.

बक्षिसांचे स्वरूप

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बक्षिसांचे स्वरूप असे ः प्रथम- एक लाख रुपये, द्वितीय- ५१ हजार रुपये, तृतीय- २१ हजार रुपये. उत्तेजनार्थ- १० हजार रुपयांची एकूण दहा बक्षिसे असणार आहेत. स्पर्धेसाठी अर्ज व नियमावली सप्टेंबरमध्ये कळविण्यात येईल. स्पर्धेत जास्तीत जास्त सार्वजनिक मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गोयल यांनी केले आहे.

Ganeshotsav 2023
Ganeshotsav 2023: पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तींना प्राधान्य! ग्राहकांकडून बुकिंगला सुरवात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.