Dhule Crime : शेती अवजारे चोरणारी टोळी जेरबंद; कोचीत जाणारी सुगंधित तंबाखू पकडली

gang that stole agricultural implements was jailed by lcb police dhule crime news
gang that stole agricultural implements was jailed by lcb police dhule crime newsesakal
Updated on

Dhule Crime : येथील एलसीबीच्या पथकाने शेती अवजारे चोरणाऱ्या सराईत टोळीला जेरबंद केले. तसेच टोळीकडून तब्बल दहा गुन्ह्यांची उकल केली.

दुसऱ्या कारवाईत दिल्लीहून कोचीकडे (केरळ) लोखंडी ट्रेच्या आडून होणारी सुगंधित तंबाखूची तस्करी रोखताना ट्रकसह १३ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईबद्दल पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी एलसीबीच्या कामगिरीची पत्रकार परिषदेतून प्रशंसा केली. (gang that stole agricultural implements was jailed by lcb police dhule crime news)

साक्री तालुक्यात शेती अवजारे चोरीच्या घटनांत वाढ होत असताना श्री. बारकुंड यांनी असे गुन्हे उघडकीस आणण्याची सूचना एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना दिली.

त्यानुसार जैताणेतील रोटाव्हेटर चोरीच्या गुन्ह्यासह साक्री, पिंपळनेर व निजामपूर पोलिस ठाण्यात दाखल शेती अवजारे चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना तांत्रिक विश्लेषण व पूरक माहितीवरून एलसीबीच्या पथकाने सोमियेल दामजी वसावा ऊर्फ समुवेल दामू गावित ऊर्फ टकल्या (वय २९), विपीन वसंत मावची (२६, रा. लहान चिंचपाडा, ता. नवापूर) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी नवापूर तालुक्यातील सुरेश ऊर्फ सुऱ्या रमेश गावित, कैलास ऊर्फ बाबा इशया वसावे, किशोर दिवज्या गावित, प्रभू होड्या गावित, अनिल लंगडया, योहान जेनू गावित, दिलीप रेवत्या गावित व अनिल रामसिंग गावित यांच्या मदतीने निजामपूर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील शेती अवजारे (रोटाव्हेटर) चोरी केल्याची कबुली दिली.

या संशयितांकडून ३५ हजारांचे शक्तिमान कंपनीचे रोटाव्हेटर व ३० हजारांचे लोखंडी नांगर, असा एकूण ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पिंपळनेर, साक्री, शिंदखेडा, निजामपूर पोलिसांत दाखल दहा गुन्हे उघडकीस आणले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

gang that stole agricultural implements was jailed by lcb police dhule crime news
Malegaon MSG College : धर्मप्रचार प्रकरणी 15 जणांविरुद्ध गुन्हा

तंबाखूचा साठा पकडला

एलसीबीकडून दुसरी कारवाई मुंबई-आग्रा महामार्गावरील सोनगीर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल न्यू सदानंदजवळ करण्यात आली. एलसीबीच्या पथकाने दुपारी दोनला दिल्लीहून कोचीकडे जाणाऱ्या आयशर कंटेनर (यूपी ८३, सीटी ५८७७)ला पकडले. चालकाने त्याचे नाव बबलू रामप्रकाश प्रजापती (वय २७, रा. इमलियाडांग, जि. महुबा, उत्तर प्रदेश) असे सांगितले.

वाहनाच्या समोरील भागावर ऑन आर्मी ड्यूटी असे लिहिलेले असल्याने चालकास विचारपूस केली असता त्याने कंटेनरमध्ये लोखंडी चॅनेलचे ट्रे असल्याचे सांगितले. मालाबाबत संशय आल्याने पथकाने कंटेनरची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्रात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आढळली.

एक लाख आठ हजारांच्या सुगंधित तंबाखूचे २० बॉक्स, दोन लाख ८० हजारांचे लोखंडी चॅनेलचे ट्रे (५६० नग) व दहा लाखांचा कंटेनर असा एकूण १३ लाख ८८ हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.

चालकाविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी किशोर बाविस्कर यांच्या फिर्यादीनुसार सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या दोन्ही कारवाया पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, प्रकाश पाटील, संजय पाटील, दिलीप खोंडे, हवालदार संतोष हिरे, पंकज खैरमोडे, मयूर पाटील, प्रशांत चौधरी, मयूर सोनवणे, महेंद्र सपकाळ, योगेश जगताप, योगेश साळवे, देवेंद्र ठाकूर, सुनील पाटील, अमोल जाधव, कैलास महाजन व राजीव गिते यांच्या पथकाने केली..

gang that stole agricultural implements was jailed by lcb police dhule crime news
Dhule Crime News : मंदिरात चोरी करणाऱ्या टोळीला अटक; चाळीसगाव रोड पोलिसांची कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.