Dhule Crime News : धुळे हादरले! हातमजूर विवाहितेवर सामूहिक अत्याचार

gang torture on married labourer woman dhule crime news
gang torture on married labourer woman dhule crime newsesakal
Updated on

Dhule Crime News : अंजनविहिरे (ता. शिंदखेडा) येथील तीसवर्षीय हातमजूर विवाहितेस बसमध्ये बसवून देतो, असे सांगत दुचाकीवरून चिमठाणे मार्गावरील अज्ञातस्थळी नेले व तेथे दोघा नराधमांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची निंदनीय घटना बुधवारी (ता. ५) रात्री अकराच्या सुमारास घडली.

या प्रकरणी शिंदखेडा पोलिसांनी संशयितास अटक केली असून, त्याला शिंदखेडा न्यायालयाने ११ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. (gang torture on married labourer woman dhule crime news)

दुसऱ्या संशयिताचा पोलिस शोध घेत आहेत. तरुण विवाहितेने गुरुवारी (ता. ६) रात्री शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे, की पाच जुलैला रात्री अकराच्या सुमारास शहादा येथील ओळखीचे केटरर्स राजू राजनी (पूर्ण नाव माहीत नाही) केटरिंग कामासाठी सवाई-मुकटी (ता. शिंदखेडा ) येथे मोटाररसायकलीने जात होते.

त्यांची मोटारसायकल दोन तरुणांनी अडविली. राजू राजनी याला पळवून लावले. नंतर नराधम तरुणांनी विवाहितेला शिवीगाळ व मारहाण केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

gang torture on married labourer woman dhule crime news
Jalgaon Fraud News : धक्कादायक! लग्नाच्या पहिल्या रात्री बायकोजवळ गेला अन... पायाखालची जमीनच सरकली...!

तसेच तिला बसमध्ये बसवून देतो, असे सांगत तिला मोटारसायकलवरून चिमठाणे मार्गालगत दलवाडे (प्र. सोनगीर) शिवारातील लाइट टॉवरजवळ नेले. तेथे तिच्यावर दोघांनी सामूहिक अत्याचार केला.

काही तासांत संशयित ताब्यात

शिंदखेडा पोलिसांनी तपासचक्रे फिरवत पंकज संजय पवार (वय २९, रा. वरझडी) याला गुरुवारी रात्री वरझडी येथून अटक केली. त्याला शिंदखेडा न्यायालयाने ११ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणी सहाय्यक निरीक्षक प्रशांत गोरावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मिलिंद पवार तपास करीत आहेत.

gang torture on married labourer woman dhule crime news
Dhule Crime News : पत्नीचे दात पाडून, हात मोडून तिला केले ठार मग पतीची आत्महत्या... कुंडाणेमध्ये संशयास्पद घटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.