Dhule Crime News : शिरपूर तालुक्यात 1 कोटीचा गांजा जप्त

Marijuana seized by the police.
Marijuana seized by the police.esakal
Updated on

Dhule Crime News : एलसीबी आणि थाळनेर (ता. शिरपूर) पोलिसांच्या कारवाईत सुमारे एक कोटी पाच लाखांचा गांजा जप्त झाला, अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी गुरुवारी (ता. १९) पत्रकार परिषदेत दिली.

हिसाळे (ता. शिरपूर) येथील देवसिंग वांगऱ्या पावरा याने गोरक्षनाथपाडा शिवारातील शेतात अवैधरीत्या गांजाच्या झाडांची लागवड केल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली.(Ganja worth 1 crore seized in Shirpur dhule crime news)

त्यानुसार पोलिस पथकातील बाळासाहेब सूर्यवंशी यांना सहकाऱ्यांसह कारवाईचे निर्देश दिले. देवसिंग पावरा कसत असलेल्या शेताचा शोध घेत तूर आणि कापूस पिकात एक हजार २४० गांजाच्या झाडांची लागवड केल्याचे पथकाला दिसले.

सुमारे ५६ लाख आठ हजार ७५० रुपयांची गांजाची झाडे जप्त केली. देवसिंग पावरा याच्याविरुद्ध थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. रवींद्र माळी, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, हर्शल चौधरी, किशोर पाटील, राजू गिते यांच्या पथकाने ही कारवाई केली.

गांजाबाबत दुसरी कारवाई

थाळनेर पोलिसांनी बभळाज शिवारातील भिवखेडपाडा येथील गांजाच्या शेतीवर कारवाई करत ४९ लाख ९९ हजार ३६५ रुपयांचा गांजा जप्त केला. पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांना भिवखेडपाडाअंतर्गत वनजमिनीवर बेकायदा गांजा लागवड केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार श्री. हिरे, नायब तहसीलदार मुकेश साळुंखे आणि थाळनेर पोलिसांच्या मदतीने भिवखेडपाडा शिवारात मुसा मालसिंग पावरा (रा. महादेव दोंडवाडा, ता. शिरपूर) हा कसत असलेल्या वनजमिनीच्या शेतात छापा टाकला.

Marijuana seized by the police.
Dhule Crime News : चोरट्यांनीच ‘त्याला’ पाजले पाणी; घाबरू नका, चाव्या द्या.. सांगत 4 घरे फोडली

भुईमूग आणि तूर पिकात त्याने ४९ लाख ९९ हजार ३६५ रुपयांची गांजाची रोपे लावल्याचे आढळले. रोपे जप्त केली. थाळनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दीपक पावरा, श्‍यामसिंग वळवी, संजय धनगर, भूषण रामोळे, किरण सोनवणे, दिलीप मोरे, प्रवीण गोसावी, भाऊसाहेब मालचे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

संशयितांविरुद्ध मोक्का लागणार

शुभम साळुंखे खून प्रकरणातील संशयितांविरुद्ध मोक्का लावला जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव आयजींकडे दिला आहे. या प्रकरणात अद्याप पोलिसांच्या हाती न लागलेले संशयित विनोद थोरात, हर्शल आणि शरद या तिघांच्या मागावर एलसीबीची दोन आणि इतर एक पथक असल्याची माहिती पोलिस अधीक्षक बारकुंड यांनी दिली.

Marijuana seized by the police.
Dhule Crime News : 6 लाखांच्या गांजासह एकाला अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.