धुळे : स्वच्छ सर्वेक्षण-२०२३ व माझी वसुंधरा अभियान व कचरामुक्त शहर अभियानांतर्गत शहरातील विविध ठिकाणी ठेवलेल्या कचराकुंड्या महापालिकेकडून उचलून घेण्यात येण्यात येत आहेत. (Garbage bins kept at various places in city picked by Municipal Corporation for Clean Survey 2023 dhule news)
त्या-त्या भागातील नागरिक, व्यापाऱ्यांनी संबंधित ठिकाणी कचरा टाकू नये, घंटागाडीतच कचरा टाकावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात येत आहे. याद्वारे शहर कचरामुक्त करून स्वच्छ धुळे शहर ठेवण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
दरम्यान, आवाहनानंतरही कुणी कचरा टाकल्यास संबंधितांना दंड करणे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.शहरात सार्वजनिक ठिकाणी, रस्ते, चौकात कचरा पडू नये यासाठी महापालिकेकडून ठिकठिकाणी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या. मात्र, या कचराकुंड्याच घाणीचे साम्राज्य निर्माण करणाऱ्या ठरत असल्याचे पाहायला मिळते.
त्या-त्या भागातील नागरिक, व्यापारी संबंधित कचराकुंड्यांमध्ये कचरा टाकताना काळजी घेत नाहीत. शिवाय या कचराकुंड्या ओव्हरफ्लो होतात. अशा कंचराकुंड्यावर नंतर मोकाट जनावरे जमतात, त्यातून अधिकच घाण होते.
त्यामुळे या कचराकुंड्याच उचलून घेत नागरिक, व्यापाऱ्यांना घंटागाडीतच कचरा टाकण्याचे आवाहन करण्यात येत आहे. बाजारपेठ भागात व्यापाऱ्यांकडून मागणी आल्यास सायंकाळीदेखील घंटागाडी पाठविण्याची व्यवस्था महापालिकेकडून करण्याचे आश्वासन व्यापाऱ्यांना दिले जात आहे.
हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?
कचराकुंड्या उचलल्या
शहरातील प्रामुख्याने मौलवीगंज, भोला बाजार, अंध शाळेसमोर, जिल्हाधिकारी निवासस्थानासमोर, साक्री रोडवरील गुरुनानक सोसायटी गेटजवळ तसेच प्रभाग क्रमांक ८ मधील मामलेदार कचेरीसमोर, मनपा जुन्या इमारतीजवळ, देवपूर भागात एल. एम. सरदार शाळेजवळ आदी विविध ठिकाणच्या कचराकुंड्या महापालिकेने उचलून घेतल्या आहेत.
या ठिकाणांवर कचरा न टाकण्याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सूचनाफलकही लावण्यात आले. यातील काही ठिकाणी मनपा कर्मचाऱ्यांकडून वॉच ठेवण्यात येत आहे. संबंधित भागातील नागरिक, व्यापाऱ्यांना कचरा न टाकण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.
नगरसेवकांचेही यासाठी सहकार्य घेतले जात आहे. मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, लक्ष्मण पाटील, प्रभारी स्वच्छता निरीक्षक शुभम केदार, मुकादम अनिल जावडेकर, त्या-त्या प्रभागातील स्वच्छता निरीक्षक व मुकादम यासाठी परिश्रम घेत आहेत.
नागरिकांना आवाहन
आपल्या घर, दुकाने व इतर आस्थापनांमधून निघणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण (ओला-सुका) करून हा कचरा घंटागाडीतच द्यावा. रस्त्यावर अथवा खुल्या जागेवर कचरा टाकू नये, असे आवाहन महापालिका आयुक्त देवीदास टेकाळे, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त विजय सनेर, कार्यालय अधीक्षक राजेंद्र माईनकर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.