Dhule News : कचरा संकलनप्रश्‍नी ‘स्वयंभू’ला नोटीस; गटारातला कचरा न उचलल्याने कारवाई

Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporationesakal
Updated on

धुळे : गटारांतून काढलेला कचरा संबंधित ठिकाणीच काही दिवस पडून असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेने कचरा संकलन करणाऱ्या स्वयंभू कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दरम्यान, उपायुक्तांच्या पाहणीत हा प्रकार आढळून आल्याने संबंधित प्रभागातील स्वच्छता निरीक्षकालाही दंड करण्यात आला. (Garbage collection issue notice to Swayambhu Action for not picking up garbage in sewers Dhule News)

धुळे शहरातील कचरा संकलनाचे काम स्वयंभू ट्रान्स्पोर्ट कंपनीला दिले आहे. कंपनीकडून घरोघरी जाऊन कचरा संकलनाबरोबरच महापालिकेच्या सफाई कामगारांनी प्रभागांमध्ये साफसफाई करून जमा केलेला कचरा, गटारांमधून काढून ठेवलेली घाणही ठेकेदाराने उचलणे गरजेचे आहे. मात्र, गटारांमधून काढलेली घाण अनेक दिवस तशीच पडून असते. उपायुक्त विजय सनेर यांनी याबाबत प्रभाग १३ मध्ये पाहणी केली.

त्या वेळी मौलवीगंज भागात गटारातील कचरा पडून असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी प्रभागाचे स्वच्छता निरीक्षक साईनाथ वाघ यांना पाचशे रुपये दंड करण्यात आला. प्रभागातील कचरा उचलण्याबाबतची जबाबदारी जशी ठेकेदाराची आहे, तशी याअनुषंगाने कामाची जबाबदारी संबंधित स्वच्छता निरीक्षकाचीदेखील आहे. त्यामुळे स्वच्छता निरीक्षक वाघ यांना दंड करण्यात आला.

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

Dhule Municipal Corporation
Orchard Grant Announced : जुन्या फळबाग पुनरुज्जीवनासाठी योजना!

दरम्यान, कचरा संकलन करणाऱ्या स्वयंभू कंपनीला या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नोटिशीचे उत्तर आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच काही घंटागाड्या बंद असल्याने स्वयंभूला ६० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला होता.

शहरातील कचरा संकलनप्रश्‍नी वॉटरग्रेस कंपनीबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी, आरोप झाल्यानंतर वॉटरग्रेस कंपनीला बाद करत महापालिकेने हे काम आता स्वयंभू कंपनीला दिले आहे. मात्र, कचरा संकलनाच्या अनुषंगाने तक्रारींचा पाढा कायम आहे. कचरा संकलन करताना घंटागाड्यांमध्ये माती भरून नेली जात असल्याचा आरोपही झाला आहे.

Dhule Municipal Corporation
Dhule News : केंद्रीय पथक करणार रुग्णालयांची पाहणी : आमदार रावल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.