धुळे : राज्य शासनाच्या मूलभूत सोयी-सुविधा योजनेंतर्गत महापालिकेने शहरातील पांझरा नदीकाठी पाच कोटी रुपये खर्चातून बगिचाचे काम केले. ९० टक्के काम झालेल्या या गार्डनचा मात्र उद्घाटनापूर्वीच सत्यानाश झाला आहे, असा आरोप करत शिवसेनेने तेथे आंदोलन केले. मनपा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. (garden in dhule city worth rs 5 crores destroyed before opening shivsena allegation political news)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे महापालिकेच्या माध्यमातून शहरात झालेल्या विविध कामांत भ्रष्टाचार झाल्याचा व त्यामुळे कामे निकृष्ट झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या आरोपांच्या अनुषंगाने पक्षातर्फे दहा दिवसांपासून आंदोलनातून कामांचा निकृष्ट दर्जा दाखविण्यात येत आहे.
शुक्रवारी (ता. २०) शहरातील पांझरा नदीकाठावर राज्य शासनाच्या मूलभूत सोयी-सुविधा योजनेंतर्गत महापालिकेने सुमारे पाच कोटी रुपये खर्चातून गेल्या चार वर्षांपासून अत्याधुनिक गार्डनचे काम सुरू आहे. ऑडिटोरियम, बगिचा, भूलभुलय्या, कारंजा, जॉगिंग ट्रॅक आदी कामांचा यात समावेश आहे.
दरम्यान, बगिचाच्या संरक्षक भिंतीवरचे प्लॅस्टर, ऑडिटोरियममधील बैठकव्यवस्थेतील फरश्या उद्घाटनापूर्वीच उखडत आहेत. लाखो रुपयांची फुले व शोभेची झाडे काही ठिकाणी जळून गेली, तर काही ठिकाणी झाडांनी माना टाकल्या आहेत. भिंतीवर तडे गेले आहेत.
कारंजाच्या टाइल्स निघून आल्या आहेत. बांधकाम डेब्रिजमुळे संरक्षक भिंतीलगतची झाडे शेवटच्या घटका मोजत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. बगिचाच्या संबंधित ठेकेदाराकडून योग्य प्रकारे काम करून घ्यावे, अशी मागणीही शिवसेनेने केली.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, महानगरप्रमुख धीरज पाटील, महानगरप्रमुख डॉ. सुशील महाजन, शहर संघटक देवीदास लोणारी, राजेश पटवारी, ललित माळी, भरत मोरे, गुलाब माळी, विनोद जगताप, मच्छिंद्र निकम, संदीप सूर्यवंशी, अण्णा फुलपगारे, भटू गवळी, प्रवीण साळवे, संजय जवराज यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी गार्डनच्या प्रवेशद्वारात मनपाच्या भ्रष्टाचारावर घोषणाबाजी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.