Dhule News : ‘जय गुरुदेव नाम प्रभू का,’ ‘शाकाहार, शुद्ध आहार,’ ‘जीवजंतूला मारू नका, मांसाहार करू नका’ हा संदेश पंचवीस वर्षांपासून सातपुड्यातील गाव-पाड्यात पोचविणारे जय गुरुदेव पंथाचे खटवानी (ता. अक्कलकुवा) येथील शिवदास जात्र्या तडवी यांनी आपल्या अंगावरील कपड्यांद्वारे (चोला) संदेश पोचवत सातपुड्यातील हजारो लोकांना मांसाहारापासून अलिप्त करून शाकाहारी बनविले आहे.(Ghajini made thousands of people in Satpura vegetarian dhule news)
खटवानी येथील शिवदास जात्र्या तडवी सातपुड्यातील खेड्यापाड्यांमध्ये गेल्या पंचवीस वर्षांपासून अंगावरील कपड्यांवर शाकाहाराचा संदेश घेऊन फिरत आहेत.
१९९७ पासून स्वतःला या कार्यात झोकून देऊन आपल्या अंगावर पांढऱ्या शुभ्र रंगाचे कपडे परिधान करून त्यावर ‘शाकाहार शुद्ध आहार’ संदेश देत सातपुड्यासह इतरत्र परिसरातील हजारो लोकांपर्यंत पोचवून त्यांना मांसाहारापासून परावृत्त करून शुद्ध शाकाहारी तसेच दारू, विडी आदींपासून व्यसनमुक्त केले आहे.
त्यांनी अनेकदा मथुरा, काशी येथे भेट देऊन दर्शन घेत इतरांनाही दर्शन घडविले आहे. या पंथाचे मुख्य भव्य मंदिर मथुरा येथे असून, या ठिकाणी असलेल्या सर्वेसर्वा (स्व.) तुलसीदास महाराज यांचे अनेकदा दर्शन घेऊन सातपुड्यातील नागरिकांनाही दर्शनासाठी नेऊन या पंथाच्या मार्गाने जीवनक्रमण करण्याचा मार्ग दाखविला आहे.
सध्या त्यांची गादी त्यांचे उत्तराधिकारी पंकज महाराज यांनी सांभाळली आहे. अक्कलकुवा शहरासह सातपुड्यातील मोलगी, वालंबा, कंकाळामाळ व धडगाव तालुक्यात लाखो अनुयायांना या मार्गावर आणले आहे.
यामुळे या लोकांचे जीवनमान व्यसनमुक्त तसेच शाकाहारी झाल्याने काहीसे उंचावले असल्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. त्यांना या परिवर्तनासाठी मिठ्याफळी येथील अमरसिंग वळवी, प्रकाश कांजी तडवी, वालंबा येथील मिठाराम वसावे यांची साथ लाभल्याचे ते सांगतात.
या पंथाचे संस्थापक व सर्वेसर्वा असलेले (स्व.) तुलसीदास महाराज यांनी मथुरा येथून अनेकदा अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गाने मार्गक्रमण केले आहे. त्यांच्या स्वारीमध्ये अनोख्या प्रकारचे पांढऱ्या शुभ्र रंगाचे आलिशान वाहन तसेच पांढऱ्या रंगाच्या आलिशान गाड्यांचा ताफा सर्वांना आश्चर्यकारक वाटत असून, आजही त्यांचे उत्तराधिकारी यांच्याही स्वारीत तोच ताफा आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.