Dhule News : मुंबई परिसरात राहणाऱ्या खानदेशवासियांसाठी ग्लोबल खानदेश महोत्सवास २८ एप्रिलपासून सुरवात होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात खानदेशी कला, खाद्य व कृषी संस्कृतीचे दालन खुले राहणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते उद्घघाटन होईल. (Global Khandesh Mahotsav for people of Khandesh is starting from 28 April dhule news)
महोत्सवास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी सभापती नरहरी झिरवळ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खनिकर्ममंत्री दादा भुसे, पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार जयकुमार रावल व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार उन्मेष पाटील,
खासदार हेमंत गोडसे, आमदार किसन कथोरे, आमदार बाळ किणीकर, आमदार गणपतशेठ गायकवाड, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार जगन्नाथ शिंदे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार किशोर पाटील, आमदार राजेश पाडवी, आमदार अनिल पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार सत्यजित तांबे, आमदार हमशा पाडवी, आमदार राजूमामा भोळे, आमदार सीमा हिरे, आमदार कुणाल पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी आमदार नरेंद्र पवार आदी उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
ग्लोबल खानदेश महोत्सवाचे स्वागताध्यक्ष सुनील चौधरी, उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील, कार्याध्यक्ष बापू हाटकर, उपाध्यक्ष एल.आर.पाटील, उपाध्यक्ष दीपक पाटील, खजिनदार ए.जी.पाटील, सहसचिव किशोर पाटील, सुभाष सरोदे, सहखजिनदार संजय बिलाले, संघटन प्रमुख प्रकाश पाटील, अनिरुद्ध चव्हाण, मिलिंद बागूल, डी.व्ही.पाटील, सतीश पाटील, शरद शिंदे आदी संयोजन करीत आहेत.
...यांना खानदेश भूषण पुरस्कार
समाजसेविका प्रतिभा शिंदे, दिग्दर्शक व निर्माते सचिन गोस्वामी या द्वयींना खानदेश भूषण पुरस्कार, निर्माते व उद्योजक प्रकाश बाविस्कर यांना खानदेश उद्योगरत्न, पर्यावरण प्रधान सचिव प्रविण दराडे, जेएनपीटीचे व्हॉइस चेअरमन उन्मेष वाघ, आयआरटीएस योगेश वाघ व सांस्कृतिक विभाग सचिव मिनाक्षी पाटील यांना खानदेशरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.