Navratri Festival 2019 : पाचवी माळेस पिवळ्या शालूने नटली आदिमाता!

fifith day of vani.jpg
fifith day of vani.jpg
Updated on

नाशिक  : अध्यात्मा बरोबरच निसर्गसौदर्याने नटलेल्या सप्तशृंगी गडावर शारदीय नवरात्रोत्सवात आदिमायेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आज ललिता पंचमी निमित्त अर्थात पाचवी माळेस आदिमायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी केली आहे.

श्री सप्तश्रृंगीच्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या आज पाचव्या माळेस ललिता पंचमी साजरी करण्यात आली. ललिता पंचमी म्हणजे कोहळा पंचमी. ललिता पंचमीच्याच दिवशी महालक्ष्मीने कोल्हासुराचा वध केला. त्यामुळे देवीच्या विविध धार्मिकस्थळी कोहळा फोडुन प्रतिकात्मक बळी दिला (कुष्मांड बळी) जातो. देवीच्या दर्शनास या दिवशी विशेष महत्व असल्याने भाविकांंची गर्दी केली आहे.

कालच्या तुलनेने आज गर्दी कमी

बुधवारी (ता.२) सुट्टी असल्यामूळे सकाळ पासून देवीच्या दर्शनासाठी लागलेल्या रांगा रात्री ११ पर्यंत कायम होत्या. कालच्या तुलनेने आज गर्दी कमी आहे. देवीची आजची पंचामृत महापुजा सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त अॅड. अविनाश भिडे यांनी सपत्नीक केली. यावेळी न्यासाचे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, उपसरपंच राजेश गवळी आदी उपस्थित होते. आज देवीस पिवळ्या रंगाचा शालु नेसवून सोन्याचा मानिक मोती जडीत मुकुट, मंगळसुत्र, वज्रटिक, पुतळी हार, कोयरीहार, नथ, कर्णफुले, कमरपट्टा, तोडे, पाउले असे आभुषणे चढवून साज शृंगार करण्यात आला होता. दरम्यान आज गडावर  खांदेशासह जिल्हाभरातून आलेल्या  भाविकांनी पारंपारीक पध्दतीने चक्रपुजेचेे सुरुवात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.