Nandurbar Fire News : शहरातील मेमन कॉलनीत असलेल्या पत्र्याच्या गोडाउनला दुपारी सव्वाबाराच्या सुमारास आग लागून टीव्ही, फ्रीज, कूलर, तसेच लग्नसमारंभासाठी लागणारे पत्रावळी, ग्लास व इतर साहित्य, सोडा बॉटल, खाद्यपदार्थ जळून खाक झाले.
या मालासह इतर पाच लोकांचा माल जळून खाक झाला आहे.( Godown fire in Shahada caused loss of lakhs of rupees nandurbar news )
सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. स्थानिक नागरिक व पालिकेच्या अग्निशमन बंबाने आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. घटनेची माहिती मिळताच शहादा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी त्वरित दाखल झाले. शहादा पोलिसांत रात्री उशिरापर्यंत आगीची नोंद सुरू होती.
शहरातील मोहिदा रस्त्यालगत श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर असलेल्या भागात मेमन वसाहत आहे. या भागात पत्र्याची शेड तयार करून दुकाने उघडण्यात आली आहेत. काही व्यापाऱ्यांनी हे गाळे भाडेतत्त्वावर घेऊन गोडाऊन केले आहे. आग लागलेल्या गोडाउनमध्ये मोहिदा रस्त्यालगत असलेल्या रूपेश भट यांचे शक्ती प्लाझा इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्रीच्या शोरूममध्ये विविध इलेक्ट्रॉनिक साहित्य ठेवले होते.
दुसरे दुकानदार धर्मेंद्र नहाटा यांनीदेखील इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक माल खरेदी करून गोडाउनला ठेवलेला होता. रियाज शेखाणी यांचे लग्नसमारंभासाठी लागणारे पत्रावळी, पेपर कप इतर साहित्य बनविण्याचे मशिन, दादाभाई इसाणी यांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य, राजू सोडावाला वहअझर इसाणी यांचे गॅस भरण्यासाठी असलेले मशिन आदी दुकानदारांचे विविध साहित्य आगीत भस्मसात झाले. पाच-सहा गोडाउनमधील सुमारे लाखो रुपयांच्या मालाची राखरांगोळी झाल्याचा अंदाज आहे.
दुपारी बारा-सव्वाबाराच्या सुमारास गोडाउनला आग लागली. पत्र्याच्या वरील शेडमधून धूर निघत असल्याचे काही रहिवासी दिसून आल्याने आरडाओरडा सुरू झाल्यानंतर मेमन कॉलनीतील रहिवाशांनी घरात मिळेल त्या भांड्यात पाणी भरून आग विझविण्यासाठी प्रयत्न करीत होते.
आगीने रौद्ररूप धारण केलेले होते. जवळजच वस्ती असल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, अग्निशमन बंब उशिरा आल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या वेळी परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, मेमन कॉलनीतील तरुणांनी यशस्वी प्रयत्न केले. अग्निशमन बंब दाखल झाल्यानंतर सुमारे पाऊण तासानंतर आग आटोक्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.