Dhule News : सांगवी (ता. शिरपूर) येथे शासन आपल्या दारी अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला.
सांगवीचे सरपंच कनिलाल पावरा अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल, पंचायत समिती सदस्या प्रभा कोकणी, सरपंच अरुणा कोळी, वन विभागाचे वनक्षेत्रपाल आनंद मेश्राम, नायब तहसीलदार साळुंखे,
पंचायत समितीचे विस्ताराधिकारी एस. एस. पवार, कृषी विस्ताराधिकारी जगदेव, सांगवी मंडळ अधिकारी प्रवीण मराठे, तलाठी के. एम. चव्हाण, कृषी मंडळ अधिकारी कैलास गोपाळ, अंगणवाडी पर्यवेक्षिका पाटील, ग्रामविकास अधिकारी एस. यू. वाघ यांच्यासह अंगणवाडीसेविका, मदतनीस, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते. (government announced benefits of various schemes under on door Dhule News)
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली. वन विभागामार्फत वनपट्ट्यांचे प्रमाणपत्र, महसूल विभागातर्फे शेतकऱ्यांना सातबारा, संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दिव्यांग प्रकरणांचे मंजुरी आदेश,
नवीन शिधापत्रिका, ग्रामपंचायतीतर्फे जन्ममृत्यूची नोंद, नमुना नंबर आठ आदींचे वितरण करण्यात आले. एप्रिल व मे महिन्यात जन्म घेणाऱ्या मुलींसाठी मच्छरदाणी, झबले, टोपी, शाम्पू, पावडर मातांना सोपविण्यात आले.
शेतकऱ्यांना औषध फवारणी पंपाचे वाटप करण्यात आले. एस. व्ही. वाघ यांनी प्रास्ताविक, तर प्रवीण शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. रघुनाथ कोळी, नीलेश जाधव, दिलीप दहिवदकर, विनायक कोकणी, राहुल कोकणी, ग्यानसिंह पावरा, अंबर नाना, बापू वडार, सूरज पावरा, गजेंद्र पावरा यांनी संयोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.