Graduate Election | मत नोंदविताना योग्य खबरदारी घ्या : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

Nandurbar district collector Manisha Khatri
Nandurbar district collector Manisha Khatriesakal
Updated on

नंदुरबार : विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी ३० जानेवारीला मतदान होत असल्याने मतदारांनी आपले मत कसे नोंदवावे, याबाबतची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली.

मत कसे नोंदवाल..

मत नोंदविण्यासाठी आपल्याला मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या जांभळ्या स्केचपेनचाच वापर करावा. इतर कोणताही पेन, पेन्सिल, बॉलपॉइंट पेन वापरू नये. आपण निवडलेल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावापुढील ‘पसंतीक्रम नोंदवा’. या रकान्यात ‘१’ हा अंक लिहून मत नोंदवा. एकापेक्षा अधिक उमेदवार निवडून द्यायचे असले तरी ‘१’ हा क्रमांक एकाच उमेदवाराच्या नावापुढे नोंदवावा. (Graduate Election Take proper precautions while voting Collector Manisha Khatri appeals Nandurbar News)

Nandurbar district collector Manisha Khatri
Nashik News : शहराच्या सुरक्षिततेसाठी ‘एक सीसीटीव्ही’; पोलिस आयुक्तांचे व्यापाऱ्यांना आवाहन

निवडून देण्यात येणाऱ्या उमेदवारांची संख्या कितीही असली तरी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या संख्येइतके पसंती क्रमांक आपणास उपलब्ध आहेत. उरलेल्या उमेदवारांकरिता आपल्या पसंतीक्रमानुसार पुढील पसंती क्रमांक अनुक्रमे २, ३, ४, इ. नोंदवावेत. कोणत्याही उमेदवाराच्या नावापुढे केवळ एकच अंक नोंदवा. एकच अंक एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावापुढे नोंदवू नका. पसंतीक्रम केवळ अंकांमध्येच नोंदवावेत, जसे की १, २, ३, इ. पसंतीक्रम एक, दोन, तीन, इ. असे अक्षरी नोंदवू नका.

अंकांच्या आंतरराष्ट्रीय लिपीमध्ये, जसे की १, २, ३, इ. किंवा रोमन लिपीमध्ये, जसे की I, II, III, इ. किंवा भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये मान्यता दिलेल्या कोणत्याही भारतीय भाषेच्या लिपीमध्ये पसंतीक्रमांक नोंदविता येतील. (अंक कोणत्याही एकाच लिपीत नोंदवावा) मतपत्रिकेवर स्वाक्षरी करू नका, आद्याक्षरे लिहू नका, आपले नाव लिहू नका किंवा कोणताही शब्द लिहू नका. मतपत्रिकेवर अंगठ्याचा ठसा उमटवू नका.

Nandurbar district collector Manisha Khatri
Municipal Corporation News : दरमहा सहा लाख खर्च, शौचालय साफसफाईची बोंबाबोब

तुमचा पसंतीक्रम दर्शविण्यासाठी ‘’ किंवा ‘’ अशा खुणा करू नका. अशा खुणा केलेल्या मतपत्रिका अवैध होतील. तुमची मतपत्रिका वैध ठरण्याकरिता तुमचा पहिला पसंतीक्रम कोणत्याही एका उमेदवाराच्या नावापुढे ‘१’ हा अंक नमूद करून नोंदविणे आवश्यक आहे. इतर पसंतीक्रम नोंदविणे केवळ ऐच्छिक आहे, बंधनकारक नाही. जिल्ह्यातील पदवीधर मतदारांनी नाशिक विभाग पदवीधर मतदानासाठी वरील सूचनांचे पालनकरुन अधिकाधिक मतदान करावे, असे आवाहन श्रीमती खत्री यांनी केले आहे.

Nandurbar district collector Manisha Khatri
Pune news : रस्त्यावर उतरायची वेळ नका आणू; आ.भीमराव तापकीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.