SSC Exam : गुजराकतमधील आजी-आजोबा दहावी परीक्षेसाठी नवापूर केंद्रात!

Senior students appeared for the 10th Gujarati subject paper
Senior students appeared for the 10th Gujarati subject paperesakal
Updated on

नवापूर (जि. नंदुरबार) : पदोन्नती, वेतनवाढ, पेन्शनसाठी मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या व गुजरात राज्यात नोकरी करणाऱ्या अथवा निवृत्त शिक्षकांना दहावीचा गुजराती हा विषय गुजरात सरकारने सक्तीचा केला आहे.

त्यामुळे परीक्षार्थी शिक्षक व निवृत्त शिक्षकांनी पदोन्नतीसाठी व वेतन निश्‍चितीसाठी येथील केंद्रावर इयत्ता दहावीचा गुजराती भाषेचा पेपर दिला. त्यासाठी चक्क आजोबा-आजी गुजरात राज्यातून नवापूरला आले होते. (Grandparents from Gujarat at Nawapur Center for SSC Exam nandurbar news)

दरम्यान, या वयात या मंडळींना परीक्षा देण्याची गरज का? असा सवाल काही विद्यार्थ्यांनी या वेळी उपस्थित केला. शिक्षणासाठी वय नाही, तर जिद्द आणि चिकाटी महत्त्वाची असते. गुजरात राज्यातील ३८ शिक्षक व निवृत्त शिक्षकांना वेतनवाढ व पेंशन वाढीसाठी वयाच्या साठ ते सत्तरीत दहावीचा गुजराती विषयाचा पेपर महाराष्ट्र राज्यात येऊन देण्याची वेळ आली आहे.

दरवर्षीच गुजरात राज्यातील असे अनेक शिक्षक-शिक्षिका दहावीचा गुजराती विषयाचा पेपर देण्यासाठी नवापूरला येत असतात. नवापूर शहर हे महाराष्ट्र व गुजरातच्या सीमेवर असल्याने या ठिकाणी गुरूवारी (ता. २) दहावीचा पहिला पेपर म्हणून मराठी, उर्दू आणि गुजराती या तीन माध्यमांची परीक्षा झाली.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

Senior students appeared for the 10th Gujarati subject paper
NMC News : शहरातील 49 रुग्णालयांना परवाना रद्दचा इशारा

दहावीच्या परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठी हे परीक्षार्थी शिक्षक, आजी-आजोबा १७ नंबरचा फॉर्म भरून परीक्षेसाठी नवापूर केंद्रात येतात. मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या व गुजरात राज्यात नोकरी करत असलेल्या शिक्षकांना तेथील सरकारने वेतनवाढ व पदोन्नतीसाठी दहावीचा गुजराती विषय सक्तीचा केला आहे.

त्यासाठी यंदा ३८ परीक्षार्थी शिक्षक व निवृत्त शिक्षक येथे आले होते. येथील सार्वजनिक गुजराती हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मराठी माध्यमाचे २८१, उर्दू माध्यमाचे ५०, गुजराती माध्यमाचे २७८ विद्यार्थी परिक्षेला बसले आहेत.

यात ३८ विद्यार्थी गुजरात राज्यातील आहेत. तालुक्यात दहावीच्या परीक्षेसाठी नवापूर, चिंचपाडा, विसरवाडी, खांडबारा, पानबारा, वडफळी, निजामपूर असे सहा केंद्र असून, एकूण ३ हजार ५६२ विद्यार्थी परिक्षेला बसले आहेत. नवापूरला गुजराती माध्यमाची शाळा असल्याने या ठिकाणी त्यांना पेपर देणे सोयीचे होते. अन्यथा एक विषय देण्यासाठी बोर्डात जावे लागते.

Senior students appeared for the 10th Gujarati subject paper
Onion Crisis : कांदाप्रश्नी केंद्रीय मंत्र्यांना शेतकऱ्यांचा घेराव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()