Dhule : राजस्थानच्या सैंधव मीठाला मोठी मागणी

pink rock salt seller from rajasthan
pink rock salt seller from rajasthanesakal
Updated on

कापडणे (जि. धुळे) : धुळे शहरासह जिल्ह्यात राजस्थानमधील (Rajasthan) सैंधव मीठ (Pink Rock Salt) विक्रेते दाखल झाले आहेत. सैंधव मीठाचे मोठे दगड ट्रॅक्टरमध्ये ठेवलेले आहेत. ते फोडून प्रती किलो चाळीस ते पन्नास प्रमाणे विक्री होत आहे. सैंधव मिठाविषयी माहीत असणाऱ्या जाणकारांकडून खरेदी होत आहे. थेट रस्त्यावर सैंधवाचे दगड बघून बघणारेही अवाक होत आहे. (Great demand for pink rock salt from Rajasthan Dhule News)

राजस्थानी विक्रेते गोपी यांनी सांगितले, सिंध मधून हे मिठाचे दगड आणतो. तेथून थेट धुळ्यात विक्रीला आलो आहोत. सैंधव मीठ म्हणजेच रॉक सॉल्ट आहे. उपयोग साधारणतः उपवासासाठी करण्यात येणाऱ्या फराळांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. कारण हे मीठ नैसर्गिकरित्या तयार केले जाते. कोणतेही रासायनिक प्रक्रिया केली जात नाही. हे मीठ समुद्राच्या मिठापेक्षा कितीतरी पटीने अधिक शुद्ध असते. सैंधव मीठ आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या मिठाचा आपण स्वयंपाकामध्येही उपयोग करू शकतो. शेंदेलोण (सैंधव), पादेलोण, बीडलवण, सांबरलोण आणि दर्याई मीठ असे आयुर्वेदामध्ये मिठाचे पाच प्रकार सांगितले आहेत. प्रत्येक प्रकार वापरणे खुपच गरजेचे असल्याचे जाणकार सांगतात.

pink rock salt seller from rajasthan
पारोळा शाळेत वही पेन देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत

शरीर डिटॉक्स होण्यास मदत
अंघोळीच्या पाण्यामध्ये हे मीठ मिश्रित केले जाते. सैंधव मीठ हे एक नॅचरल पेनकिलर म्हणजे वेदनाशामक प्रमाणे कार्य करते. यातील पोषक घटकांमुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते. शरीरातील अतिरिक्त विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर फेकले जातात. अंघोळीसाठी खुपच उपयुक्त आहे. धुळे शहरात सैंधव मिठाची मागणी वाढली आहे. विविध आजार आणि दररोज वापरले जाणारे मीठ वर्ज्य केलेल्या व्यक्ती सैंधव खरेदी करण्यास प्राधान्य देत होते.

pink rock salt seller from rajasthan
Jalgaon : पाटणा परिसरातील गावठी दारूच्या हातभट्टी नष्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.