Dhule Marathon 2024 : धुळे मॅरेथॉन 2024 ला महाप्रतिसाद! सेलिब्रेटींमुळे उत्साह द्विगुणित

गेल्या वर्षीपेक्षा यंदा धुळेकरांसह स्पर्धकांनी धुळे मॅरेथॉन स्पर्धेवर महाप्रतिसादाचा कळस चढविला.
Dhule marathon 2024
Dhule marathon 2024esakal
Updated on

धुळे : गेल्या वर्षीपेक्षा यंदा धुळेकरांसह स्पर्धकांनी धुळे मॅरेथॉन स्पर्धेवर महाप्रतिसादाचा कळस चढविला. पोलिस कवायत मैदान आणि मॅरेथॉनचा मार्ग असलेल्या आग्रा रोडवर धावपटूंनी आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवली.

देशभक्तिपर, स्फूर्तिदायक गीतांमुळे उल्हासित वातावरण आणि ठसकेबाज सिनेगीतांच्या तालावर डोलत तरुणाईसह आबालवृद्धांनी रविवार (ता. ४) आनंददायी केला. यात शारीरिक स्वास्थ्य जोपासण्याचे आवाहन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कुस्तीगीर संग्राम सिंग यांनी केले. (Great response to Dhule Marathon 2024 Celebrity doubles excitement)

येथील पोलिस कवायत मैदानावरून रविवारी सकाळी सहाला धुळे मॅरेथॉन २०२४ (सिजन २) स्पर्धेला सुरवात झाली. धुळेकरांचे आरोग्यहित जोपासावे, निरामय जीवनासाठी मॅरेथॉनच्या माध्यमातून जनजागृतीपर लोकोत्सव साजरा करण्याचा जिल्हा पोलिस दलाचा उपक्रम प्रशंसनीय आहे.

त्यास जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, जिल्हा परिषद, शैक्षणिक क्षेत्रातील अग्रेसर एव्हीकेएम संस्था, रोटरी क्लब ऑफ धुळे आणि ‘सकाळ माध्यम समूहा’ची लाभलेली बहुमोल साथ फलदायी ठरली. त्यामुळे २५ हजारांहून अधिक धुळेकरांनी मॅरेथॉनला दिलेला महाप्रतिसाद अवर्णनीय, ‘रेकॉर्ड ब्रेक’ असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

Dhule marathon 2024
Dhule Marathon: स्वच्छता पाळा-निरामय आयुष्य जगा! महापालिका पथकाचा कृतीतून संदेश; मॅरेथॉनपूर्वी रात्री 2 पर्यंत स्वच्छता

ब्रँड अम्बॅसिडर, नेते उपस्थित

ब्रँड अम्बॅसिडर संग्राम सिंग, सिनेतारका संस्कृती बालगुडे, अर्जुन पुरस्कारप्राप्त व सावरपाडा एक्स्प्रेस म्हणून नावाजलेली धावपटू कविता राऊत, नववारी साडीत धावत विश्‍वविक्रम करणाऱ्या क्रांती साळवे आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी तथा अप्पर पोलिस अधीक्षक विजय चौधरी यांच्यासह खासदार डॉ. सुभाष भामरे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्ता कराळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे,

आमदार जयकुमार रावल, आमदार मंजूळा गावित, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, ‘सीईओ’ शुभम गुप्ता, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष देवरे, ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर,

भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, शहर विधानसभाप्रमुख अनुप अग्रवाल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्‍याम सनेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अतुल सोनवणे,

माजी आमदार शरद पाटील, माजी आमदार अनिल गोटे, प्रशांत भदाणे, शिवसेना शिंदे गटाचे सतीश महाले, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती हर्षवर्धन दहिते, महिला व बालकल्याण सभापती संजीवनी शिसोदे, माजी महापौर प्रतिभा चौधरी, प्रदीप कर्पे, वैशाली शिरसाट आदी उपस्थित होते.

Dhule marathon 2024
Dhule Marathon 2024: ‘हिट धुळे-फिट धुळे’सह जल्लोष! पोलिस कवायत मैदानावर फुल टू धमाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.