वडाळी : शहादा तालुक्यात काही भागांत उन्हाळी पीक पेरणीस प्रारंभ झाला आहे. मागील वर्षी उन्हाळी पिकांचे सरासरी क्षेत्र दोन हजार ६९३ हेक्टर होते. यंदा सरासरी क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर उन्हाळी पिकांच्या पेरण्या होण्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाची पेरणी करण्यास सुरवात केली आहे.
तालुक्यात उन्हाळी हंगामात उन्हाळी भुईमूग व मका ही पिके घेतली जातात. जनावरांना चारा उपलब्ध व्हावा या दृष्टीने मका पिकावर भर दिला जात आहे. रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड झाली आहे.
शहादा तालुक्यातील अनेक गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे झाली आहेत. यामुळे या उन्हाळी भुईमूग, मका, सूर्यफूल, बाजरी, मुगाची पेरणी होणार आहे. जनावरांच्या चाऱ्याच्या दृष्टीने यंदा मक्याची जास्त पेरणी होण्याचा अंदाज आहे. (Groundnut maize area will increase Start of sowing of summer crop expectation of guaranteed price Nandurbar News)
खरीप हंगामात नगदी पिकांमुळे भुईमूग पिकाचे क्षेत्र महागाई, मजुरीअभावी दिवसेंदिवस घटत आहे. भुईमूग शेंगांना बाजारात अपेक्षित भाव मिळत नाही. तोडणीसाठी ९० ते १०० रुपयांपर्यंत खर्च जातो, पाऊस पडला तर हातचा आलेला चारादेखील वाया जातो.
तालुक्यात ज्या भागात पाण्याची उपलब्धतता आहे, अशा भागात उन्हाळी पेरण्या होणार आहेत. शहादा तालुक्यात उन्हाळी भुईमुगाच्या पेरणीस प्रारंभ झाला आहे. तालुक्यात मागील वर्षी भुईमुगाचे ५८४, तर मक्याचे ३१७ असे एकूण ९०१ हेक्टर सरासरी क्षेत्र पेरणी झाले होते. जानेवारीच्या सुरवातीपासूनच भुईमुगाच्या पेरणीस सुरवात झाली.
तालुक्याच्या उत्तर-पश्चिम भागात भुईमुगाची लागवड करण्यात येत आहे. काही ठिकाणी भुईमूग लागवड आंतरपीक म्हणून घेतले जाते. जूनमध्ये ओल्या भुईमूग शेंगांना दर चांगला मिळतो, या दृष्टीने मार्चमध्येही भुईमूग पिकाची लागवड सर्वाधिक केली जाते.
हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल
"मजुरीच्या मानाने शेंग परवड नाही. बाजारात शेंगतेलाला भाव आहे, मात्र शेंगेस भाव मिळत नाही. बियाणे महागले आहे. तोडणीस मजूरवर्ग मिळत नाही. मिळालाच तर मजुरीही महागली आहे. दर वर्षी भुईमूग पेरणी करतो. माझ्याकडे जनावरे आहेत, त्यांना चारा होतो, तर भुईमूग शेंगेस बाजारात हमीभाव मिळत नाही."
-ईश्वर सोनवणे, भुईमूग उत्पादक शेतकरी, वडाळी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.