Anil Patil News : शेतकऱ्यांच्या पदरात अधिकाधिक नुकसानभरपाई : पालकमंत्री अनिल पाटील

Guardian Minister Anil Patil inspecting banana and papaya orchards damaged due to bad weather on Monday evening. Neighbor Tribal Development Minister Dr. Vijay Kumar Gavit, Tehsildar Deepak Girase and farmers.
Guardian Minister Anil Patil inspecting banana and papaya orchards damaged due to bad weather on Monday evening. Neighbor Tribal Development Minister Dr. Vijay Kumar Gavit, Tehsildar Deepak Girase and farmers.esakal
Updated on

Anil Patil News : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, अधिकाधिक नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या पदरात पाडून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे पालकमंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.(Guardian Minister Anil Patil statement of More compensation for farmers nandurbar news)

काकर्दा (ता. शहादा) परिसरात गुरुवारी (ता. ३०) रात्री दहाच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह सुमारे वीस मिनिटे चाललेल्या पावसाने क्षणार्धात केळी, पपईसह अन्य पिके भुईसपाट केली. या वेळी सायंकाळी उशिरा पालकमंत्री अनिल पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली.

त्यांच्यासमवेत आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती हेमलता शितोळे, तहसीलदार दीपक गिरासे, नायब तहसीलदार विजय सावळे, गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे, जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव पाटील, शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, सामाजिक कार्यकर्ते के. डी. नाईक, उपविभागीय कृषी अधिकारी तानाजी खर्डे, तालुका कृषी अधिकारी के. एस. वसावे, पर्यवेक्षक कृष्णा निकम, मंडळाधिकारी गजानन पवार आदींसह परिसरातील शेतकरी, सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.

Guardian Minister Anil Patil inspecting banana and papaya orchards damaged due to bad weather on Monday evening. Neighbor Tribal Development Minister Dr. Vijay Kumar Gavit, Tehsildar Deepak Girase and farmers.
Anil Patil News : प्रथमच आमदार, मंत्री अन्‌ थेट पालकमंत्रीपद; अनिल पाटील यांना पालकत्व ठरणार फायद्याचे

एकाही शेतकऱ्याचा पंचनामा सुटायला नको

पालकमंत्री पाटील यांच्यासमोर शेतकऱ्यांनी पिकासाठी झालेला खर्च व झालेल्या नुकसानीबाबत माहिती दिली. यावर श्री. पाटील यांनी मी स्वतः शेतकरी असून, शेतकऱ्यांच्या व्यथांची मला चांगली जाण आहे. वर्षभर राबराब राबून केळी पिकाला लहान बाळासारखे जपावे लागते, तेव्हा उत्पादन येते तोपर्यंत अमाप खर्च झालेला असतो याची मला जाणीव आहे.

शेतकऱ्यांवर आलेल्या संकटांच्या मागे सरकार खंबीरपणे उभे आहे. शासनाकडून जेवढी शक्य होईल तेवढी अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी कॅबिनेटच्या बैठकीत संपूर्ण पंचनाम्याचे अहवाल आल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले. जिल्हा प्रशासनाकडून नुकसानग्रस्त एकाही शेतकऱ्याचा पंचनामा सुटणार नाही याची दक्षता घ्यावी, असे सांगितले.

Guardian Minister Anil Patil inspecting banana and papaya orchards damaged due to bad weather on Monday evening. Neighbor Tribal Development Minister Dr. Vijay Kumar Gavit, Tehsildar Deepak Girase and farmers.
Anil Patil News : अमळनेरच्या चौकांमध्ये झळकणार रंगीत पथदीप; मंत्री अनिल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.