नंदुरबार : चीनसह इतर देशांमध्ये कोरोनाची बी-एफ-७ च्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी यंत्रणांना दिले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा पोलिस अधीक्षक पी. र. टील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद चौधरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. के. डी. सातपुते, डॉ. राजेश वसावे, डॉ. रविदास वसावे आदी उपस्थित होते. (Guardian Minister Dr. Vijaykumar gavit say Take necessary measures against Corona Nandurbar News)
पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, गेल्या लाटे दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात आपल्याला यश आले. तरी आपल्याला गाफील राहून चालणार नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने कोविड रुग्णालये आणि कोविड केअर सेंटर इमारतीची तपासणी करुन त्यामधील आवश्यक साहित्य हे कुठल्याही क्षणी वापरता येतील अशा स्थितीत ठेवण्याबाबत सज्ज राहावे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिंदे यांनी मागील वर्षातील कोविड रुग्ण, ऑक्सिजन बेड, कोविड केअर सेंटर, औषधसाठा, लसीकरण तसेच, प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. बैठकीस तहसीलदार, मुख्याधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बूस्टर डोस घेण्याचे आवाहन
सर्व ठिकाणी ऑक्सिजन व व्हेंटिलेटरयुक्त बेड्स, पुरेसा औषधसाठा व वैद्यकीय साधनसामग्री, आरटीपीसीआर किट, ॲन्टीजन किटची मागणी आदींचे आतापासूनच नियोजन करावे. आरोग्य विभागाने लक्षणे असलेल्या संशयित रुग्णांची माहिती घेऊन त्यांची आरटीपीसीआर चाचणी करावी. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क आणि सामाजिक अंतराचे पालन करावे. नव्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लस हाच रामबाण उपाय आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. अद्यापही ज्या नागरिकांनी पहिला, दुसरा व बूस्टर डोस घेतला नसेल त्यांनी त्वरित डोस घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.