Dhule News : अध्यक्षांना राजीनामा देण्याचे सूचित : पालकमंत्री महाजन

zp dhule
zp dhuleesakal
Updated on

Dhule News : येथील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बदलामागे सध्या राजकीय नाट्य रंगलेले आहे. जिल्हा परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता असून, दोन गटांमध्ये अध्यक्ष बदलावरून रस्सीखेच सुरू आहे.

या नाट्याचा अंक आता पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या पटलावर पोचला आहे. त्यांनी अध्यक्षा अश्‍विनी पवार- जाधव यांना राजीनामा देऊन टाका, अशी सूचना दिली आहे.(Guardian Minister Mahajan statement Intimation to President to resign jalgaon news )

पालकमंत्र्यांच्या निर्णयाचा आदर राखला जाईल, त्यांच्याशी लवकरच पुन्हा चर्चा केली जाईल, याबरोबर जिल्ह्यातील तीन नेत्यांच्या संयुक्त बैठकीत बाजू मांडल्यानंतर होणारा योग्य तो निर्णय अमलात आणला जाईल, अशी भूमिका पवार-जाधव गट मांडत आहे.

जिल्हा परिषदेवर भाजपचा एकछत्री अमल आहे. पंचवार्षिक निवडणुकीतील पहिली अडीच वर्षे डॉ. तुषार रंधे (बोराडी, ता. शिरपूर) अध्यक्ष, तर कुसुम निकम (विखरण, ता. शिंदखेडा) उपाध्यक्ष होत्या. त्यांचा कार्यकाल संपुष्टात आल्यानंतर धुळे शहरातील बैठकांमध्ये नवीन अध्यक्ष निवडीबाबत खल चालला.

अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांना दोन दिवस तळ ठोकून राहावे लागले. त्यांच्यासोबत माजी मंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल, माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल आणि माजी केंद्रीय मंत्री व खासदार डॉ. सुभाष भामरे व इतर नेतेमंडळी, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पवार, पाटलांची निवड

बैठकीत अध्यक्षपद धुळे तालुक्यास व उपाध्यक्षपद शिरपूर तालुक्यास देण्यात आले. त्यानुसार अश्‍विनी पवार यांची अध्यक्ष, तर देवेंद्र पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. असे असताना उर्वरित अडीच वर्षांच्या कालावधीत अध्यक्ष, उपाध्यक्षपद सव्वा-सव्वा वर्षे विभागून दिले जाईल, असाही निर्णय बैठकीत झाल्याचा दावा झाला.

zp dhule
Dhule News : मनपा सदस्य चौधरींकडून प्रश्‍नांची मांडणी; पाणीप्रश्‍नी मनुष्यबळाला मंजुरी

या निर्णयाची वेळेत अंमलबजावणी व्हावी यासाठी भाजपच्या काही जिल्हा परिषद सदस्यांचे शिष्टमंडळ आमदार रावल, आमदार पटेल, खासदार डॉ. भामरे यांना भेटले. त्यात अध्यक्ष बदलाची मागणी करण्यात आली. यानंतर सदस्यांचे शिष्टमंडळ बुधवारी (ता. ८) पालकमंत्री महाजन यांच्या भेटीला पोचले.

राजीनामा द्यावा

पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषद सदस्यांच्या शिष्टमंडळाची भूमिका जाणून घेतली. त्यांनी सदस्यांसमोरून जिल्हा परिषद अध्यक्षांचे प्रतिनिधी माजी सभापती प्रा. अरविंद जाधव यांच्याशी संवाद साधला. त्यानुसार ठरल्याप्रमाणे अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन टाका, अशी सूचना पालकमंत्र्यांनी दिली.

त्यावर तुमची लवकरच भेट घेऊन भूमिका मांडू इच्छितो, अशी विनंती पालकमंत्र्यांना केल्याचे जाधव गटातर्फे सांगण्यात आले. पालकमंत्र्यांमधील भेटीगाठी आणि महाजन-जाधव यांच्यातील संवादानंतर अध्यक्षा पवार या दोन दिवसांत राजीनामा देतील, अशी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या संबंधित सदस्य शिष्टमंडळाला आहे.

नेत्यांच्या बैठकीत बाजू मांडणार

या पार्श्वभूमीवर पवार-जाधव गटातर्फे सांगण्यात आले, की आमदार रावल, आमदार पटेल व खासदार डॉ. भामरे यांची संयुक्त बैठक झाल्यावर त्यात होणाऱ्या योग्य त्या निर्णयावर अंमलबजावणी केली जाईल. या तीन नेत्यांपुढे योग्य ती भूमिका मांडली जाईल. पालकमंत्री महाजन यांचीही लवकर भेट घेऊन योग्य ती भूमिका मांडली जाणार आहे.

zp dhule
Dhule News : हद्दवाढीतील रहिवाशांना ‘दिवाळी गिफ्ट’; आयुक्तांचा निर्णय

या नेत्यांनी बाजू मांडण्याची संधी द्यावी, अशी अपेक्षा आहे. पहिल्या अडीच वर्षांतील अध्यक्ष, उपाध्यक्षांनी पावणेतीन वर्षे कार्यभार सांभाळला. नंतर पुन्हा वर्षभर मुदतवाढीसाठी त्यांचा प्रयत्न होता. त्याप्रमाणे पुढील अडीच वर्षांतील अध्यक्ष, उपाध्यक्षांना कार्यकाळ मिळावा, अशी माफक अपेक्षा आहे.

zp dhule
Dhule News : भारत संकल्प यात्रेचे काटेकोर नियोजन करा : शुभम गुप्ता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.