Gulabrao Patil News : नोकरदार वराच्या अपेक्षेतून सामाजिक असंतुलन : गुलाबराव पाटील

With meritorious students of Dode Gurjar community Minister Gulabrao Patil, MLA Amrishbhai Patel, MLA Kashiram Pavara, Dr. Tushar Randhe and officials.
With meritorious students of Dode Gurjar community Minister Gulabrao Patil, MLA Amrishbhai Patel, MLA Kashiram Pavara, Dr. Tushar Randhe and officials.
Updated on

Gulabrao Patil News : दोडे गुर्जर समाजात मुलींचे उच्चशिक्षण घेण्याचे प्रमाण खूप वाढले, ही समाधानाची बाब आहे. पण, त्याबरोबरच मुलींसह पालकांकडून नोकरदारच वर हवा, ही अपेक्षा केली जात असल्याने सामाजिक असंतुलन वाढले आहे.

उत्कृष्ट शेती करणारी मुलेही समाजात आहेत. त्यांना नाउमेद करणे योग्य नाही. समाजातील उच्चशिक्षित मुला-मुलींनी संतुलन राखण्यासाठी गांभीर्याने पावले उचलायला हवीत, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जळगाव येथील दोडे गुर्जर संस्थानतर्फे रविवारी (ता. २४) येथील मनोमीलन मंगल कार्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात ते बोलत होते. आमदार अमरीशभाई पटेल अध्यक्षस्थानी होते. (Gulabrao Patil statement about Social Imbalance Due to Expectation of Employed Groom dhule news)

आमदार काशीराम पावरा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, बाजार समितीचे सभापती के. डी. पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सी. झेड. पाटील, माजी सदस्य रूपसिंह चौधरी, अंबरनाथ येथील माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. एल. ए. पाटील, एसव्हीकेएम हॉस्पिटलचे प्रकल्प संचालक गुलाबराव गुजर, जळगाव जिल्हा परिषदेचे माजी सभापती पी. सी. पाटील, जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या माजी उपाध्यक्षा इंदिरा पाटील, माजी सरपंच देवीदास गुजर, जळगाव मार्केटिंग फेडरेशनचे माजी अध्यक्ष रामनाथ पाटील, दोडे गुर्जर संस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, उपाध्यक्ष अशोक जाधव, सचिव डॉ. राधेश्याम चौधरी उपस्थित होते.

सर्वांनीच भोगली सत्ता

राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना मंत्री पाटील म्हणाले, की एकही पक्ष असा नाही, ज्याने गेल्या पाच वर्षांत सत्ता भोगली नाही. पहाटेचा, दुपारचा आणि सायंकाळचा शपथविधी झाला. त्या वेळी मी हजर होतो. मात्र, लोकसेवा आणि जनाधारामुळे आठ वर्षे मला मंत्रिपदी राहण्याची संधी मिळाली.

आमच्या समाजाने प्रामाणिकपणाचे संस्कार दिले आहेत. माझी बांधिलकी सर्व समाजाशी आहे. त्यामुळे स्वत:चा समाज अल्पस्वल्प असूनही चारदा आमदारकी भूषवण्याची संधी मिळाली. आपल्या वाईट वेळेत जो सोबत राहिला, त्याच्याशी प्रामाणिक राहा, असे आवाहन त्यांनी केले.

With meritorious students of Dode Gurjar community Minister Gulabrao Patil, MLA Amrishbhai Patel, MLA Kashiram Pavara, Dr. Tushar Randhe and officials.
Gulabrao Patil News : नावीन्यपूर्ण, तंत्रज्ञानस्नेही उपक्रम राबवा : पालकमंत्री पाटील

...तर १७ नंबरचा फॉर्म भरू

मंत्री पाटील म्हणाले, की विधानसभा निवडणूक म्हणजे आमची परीक्षाच असते. पास झालो तर कामे करू, नाही तर १७ नंबरचा फॉर्म भरून पुन्हा प्रयत्न करू. मंत्रिपद सेवेचे माध्यम मानले म्हणून टिकलो आहे. अमरीशभाईंनी गुजर समाजाबरोबरच सर्वांना न्याय दिला म्हणून त्यांची मतदारसंघावरील पकड अबाधित आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुला-मुलींना उच्चशिक्षण द्या

आमदार अमरीशभाई पटेल म्हणाले, की गुजर समाज कृषिनिष्ठ आहे. मात्र, येत्या काळात केवळ शेतीच्या आधारावर सर्वांगीण उन्नती होणार नाही, हे लक्षात घ्यावे. आपल्या मुला-मुलींना उच्चशिक्षणासाठी प्रेरित करावे.

वेळोवेळी त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घ्यावा. लोकसंख्या वाढीमुळे स्पर्धाही तीव्र झाली आहे. त्यामुळे जेथे खऱ्या अर्थाने सक्षम विद्यार्थी घडविण्याची परंपरा असेल, त्या शिक्षण संस्थांची निवड करावी.

प्रशांत चौधरी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. दोडे गुर्जर समाजातील अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रात प्रविष्ट विद्यार्थी, राज्य शासन व केंद्र सरकारच्या विभागांमध्ये स्पर्धा परीक्षांद्वारे नियुक्त अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांवर नियुक्त पदाधिकारी, दहावी-बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला. शहरातील दोडे गुर्जर समाजाचे विश्वस्त प्रा. निश्चल पाटील, अ‍ॅड. मंगलसिंह चौधरी, संभाजी पाटील, संजय पाटील, मनोहर पाटील, दिनेश गुजर, दिनेश पाटील आदींनी संयोजन केले.

With meritorious students of Dode Gurjar community Minister Gulabrao Patil, MLA Amrishbhai Patel, MLA Kashiram Pavara, Dr. Tushar Randhe and officials.
Gulabrao Patil : पाच वर्षांत तीन शपथविधी, तीनही वेळा आपण उपस्थित; गुलाबराव पाटलांचं विधान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.