Nandurbar News : पटसंख्या टिकविण्यासाठी गुरूजींकडून विद्यार्थ्यांचा शोध; भटकंतीची वेळ

School News
School Newsesakal
Updated on

Nandurbar News : शहरी भागाबरोबर ग्रामीण पालकांना खासगी शाळांची भुरळ पडत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. पटसंख्या टिकवण्यासाठी शिष्यांच्या शोधात गुरुजींची भटकंती सुरू असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे.

शैक्षणिक सत्र सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे पालक विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत गुंतले आहेत. त्यामुळे खासगी शाळांतील शिक्षक विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. (Guruji search for students to maintain count Wandering time zp Challenge of private institutions for schools Nandurbar news)

ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळांमध्ये पटसंख्या कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांना शोधून त्यांना आपल्या शाळेत प्रवेश देण्यासाठी शोधा-शोध सुरू झाली आहे. खाइगी संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

त्यासाठी शिक्षक ग्रुप करून विद्यार्थ्यांच्या शोध घेत आहेत. संस्थेने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक प्रलोभने दिली जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचीही या शाळेतून त्या शाळेत प्रवेशासाठी लगबग सुरू आहे.

आर्थिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थ्यांच्या नामवंत शाळांकडे रांगा लागत आहेत. तर, अन्य शाळांमधील शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी भटकावे लागत आहे.

School News
Crime News Nagpur : कावीळच्या औषधीसाठी आली अन् बाळ घेऊन गेली

मराठी शाळांची दयनिय अवस्था

मराठी शाळांची विद्यार्थीसंख्या दरवर्षी कमी होत असल्याने शाळा टिकविणे हे संस्थांचे उद्दिष्ट्य आहे. त्याचा अंतिम परिणाम हा शिक्षकांवर होत आहे. त्यामुळे नोकरी टिकावी या अपेक्षेने त्यांनी विद्यार्थ्यांची शोधमोहिम सुरू केली आहे.

यात अनेकांना यश येत असले, तरी प्राथमिक शाळांमध्ये अद्यापही विद्यार्थीसंख्येची वानवाच दिसून येत आहे. दिवसेंदिवस मराठी शाळांची अवस्था बिकट होत चालल्याने पुढे मराठी शाळांचे भवितव्य काय? असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे.

खासगी शिक्षण संस्थांची तत्परता आणि गतिशील नियोजन यामुळे विद्यार्थी त्या शाळांकडे वळत आहेत. परिणामी ग्रामीण भागात विद्यार्थीसंख्या रोडावली आहे. विद्यार्थी गळतीचा हाच वेग कायम राहिल्यास मराठी शाळा बंद पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मराठी वाचेल काय, मराठी संस्कृती टिकून राहणार का? असेही प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

School News
Dada Bhuse News : Quality City मधून होणार नाशिकचा कायापालट : दादा भुसे

गुणवत्ता सुधारणे गरजेचे

शिक्षकांकडून विद्यार्थ्यांची मनधरणी करून शाळांमध्ये प्रवेश दिला जात आहे. अनेक शाळांमध्ये पटसंख्या कायम ठेवण्यासाठी धडपड सुरू आहे.

दरवर्षी विद्यार्थी शोधण्यापेक्षा शाळेतील शिक्षणाचा दर्जा सुधारून विद्यार्थ्यांना आकर्षित केल्यास, दरवर्षी होणारी विद्यार्थ्यांची शोध मोहीम थांबण्यास मदत होईल. पटसंख्या वाढेल. असे मत ग्रामीण भागातील सुज्ञ पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

School News
Sanjay Raut News: नाशिकमध्ये संजय राऊत पुन्हा बरळले, ‘थुंकणं ही हिंदू संस्कृती‘

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.