Nandurbar Crime News : खेतिया-शहादा रस्त्यावर 1 लाखाचा गुटखा जप्त

सार्वजनिक जागी एक लाख रुपये किमतीच्या गुटखा म्हसावद पोलिसांनी पकडला असून, संशयित आरोपीस अटक करून गुन्हा नोंद केला आहे.
Inspector Rajan More and staff of Mhasavad Police Station along with the suspected accused and seized Gutkhas.
Inspector Rajan More and staff of Mhasavad Police Station along with the suspected accused and seized Gutkhas.esakal
Updated on

Nandurbar Crime News : खेतिया-शहादा रस्त्यावर सुलतानपूर फाटा येथे सार्वजनिक जागी एक लाख रुपये किमतीच्या गुटखा म्हसावद पोलिसांनी पकडला असून, संशयित आरोपीस अटक करून गुन्हा नोंद केला आहे.

म्हसावद पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक राजन मोरे यांनी गुप्त माहितीच्या आधारे हवालदार बहादूर भिलाला, पोलिस नाईक दादाभाई साबळे. (Gutkha worth 1 lakh seized in Khetia Shahada road nandurbar crime news)

Inspector Rajan More and staff of Mhasavad Police Station along with the suspected accused and seized Gutkhas.
Cyber Crime : आता कंपनीचे कॉल्स येणार सहा अंकी क्रमांकावरुन; फोनवरुन होणाऱ्या फसवणुकीला बसणार आळा!

पोलिस शिपाई राकेश पावरा, सचिन तावडे यांनी सापळा रचून खेतिया शहादा रस्त्यावर सुलतानपूर फाटा येथे सार्वजनिक जागी काळ्या रंगाची ॲपे रिक्षा (एमएच १८, बीएच १४८४) आढळली.

रिक्षा तपासणी केली असता त्यात एक लाख ८९६ किमतीच्या एकूण पाच निळ्या रंगाच्या मोठ्या गोण्या, त्यात प्रत्येकी ५२ केसरयुक्त विमल पानमसाला गुटख्याचे पाउच असे एकूण २६० पाउच, पांढऱ्या रंगाच्या एकूण पाच गोण्या, प्रत्येक गोणीमध्ये ५२ तंबाखूचे पाउच एकूण २६० पाउच.

तीन पांढऱ्या रंगाच्या गोण्या, त्यात ६० खोके, तीन लाख रुपये किमतीची काळ्या रंगाची ॲपे रिक्षा असा एकूण चार लाख ८९६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

संशयित आरोपी फैजान मोहम्मद सिराज अन्सारी (वय २१, रा. आझादनगर, वडजाई रोड, धुळे) याला अटक केली. म्हसावद पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजन मोरे तपास करीत आहेत.

Inspector Rajan More and staff of Mhasavad Police Station along with the suspected accused and seized Gutkhas.
Crime News : मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थिनींचे अपहरण करण्याचा प्रयत्न; बुलेटस्वार फरार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.