Dhule Crime News : सोनगीर टोलप्लाझावर 33 लाखांचा गुटखा जप्त; 6 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

Assistant Police Inspector Ganesh Phad and colleagues along with the suspect caught with Gutkha and container.
Assistant Police Inspector Ganesh Phad and colleagues along with the suspect caught with Gutkha and container.esakal
Updated on

Dhule Crime News : राज्यात प्रतिबंधित असलेला सुमारे ३३ लाख रुपये किमतीचा पानमसाला व गुटखा येथील पोलिसांनी पकडला असून, गुटखा वाहतूक करणाऱ्या कंटेनरसह ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुटख्यावरील सर्वांत मोठी कारवाई आहे. येथील टोलप्लाझावर रविवारी (ता. ८) पहाटे दोनच्या सुमारास कंटेनर ताब्यात घेण्यात आला असून, सहा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यांपैकी एका संशयितास अटक झाली असून, तो वाहनचालक आहे.(Gutkha worth 33 lakh seized at Songir toll plaza dhule crime news )

दिल्लीहून धुळ्याकडे येणाऱ्या कंटेनर (आरजे ११, जीसी ४४३३)मधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला अपायकारक पानमसाला व गुटखा राज्यात विक्रीसाठी नेला जात असल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलिसांनी टोलनाक्याजवळ सापळा रचला. रात्री दोनच्या सुमारास कंटेनर आला.

तो थांबवून तपासणी केली असता त्यात गुटख्याच्या ६७ गोण्या भरलेल्या आढळल्या. सुमारे ३३ लाख ४३ हजार ४४४ रुपयांचा गुटखा व १५ लाख रुपयाचा कंटेनर असा एकूण ४८ लाख ४३ हजार ४४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Assistant Police Inspector Ganesh Phad and colleagues along with the suspect caught with Gutkha and container.
Dhule Crime News : दरोडेखोरांच्या टोळीमधील संशयित 2 जणांना बेड्या; 2 दुचाकी जप्त

अन्न व औषध प्रशासन अधिकारी अनिल पवार, धुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक दिलीपकुमार बटेश्वरनाथ दुबे (वय ४३, रा. कुसाडा मधुपूर, पो. सुरियावा, ता.जि.भदोही, उत्तर प्रदेश) व गुटखामालक रिंकूसिंग (रा. दिल्ली), विकत घेणारे सिकंदर, राजेश वाला व अख्तर (सर्व रा. मुंबई) तसेच वाहनमालक मे. हरी एक्स्प्रेस (दिल्ली) अशा सहा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, उपनिरीक्षक विजय चौरे तपास करीत आहेत.

ही कारवाई धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश फड, उपनिरीक्षक चौरे, हवालदार संजय देवरे, पोलिस नाईक अमरिश सानप, राकेश ठाकूर, नितीन जाधव, विजयसिंग पाटील यांनी केली.

Assistant Police Inspector Ganesh Phad and colleagues along with the suspect caught with Gutkha and container.
Dhule Crime News : धुळ्यात तरुणाची निर्घृण हत्या; 11 जणांवर गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.