Dhule Crime : वार्सा फाट्यावर 97 हजारांचा गुटखा जप्त; पिंपळनेर पोलिसांची कारवाई

Dhule Crime : वार्सा फाट्यावर 97 हजारांचा गुटखा जप्त; पिंपळनेर पोलिसांची कारवाई
Updated on

Dhule Crime : पिंपळनेर पोलिसांनी वार्सा (ता. साक्री) फाट्यावर ९७ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. (Gutkha worth 97000 was seized at Varsa Phata dhule crime news)

पिंपळनेरचे प्रभारी पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पथकाने गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास वार्सा फाट्याजवळ सापळा रचला. संशयित मोहम्मद अनिस मोहम्मद हनीफ मोमीन (रा. निशांत मुलींच्या शाळेजवळ, इस्लामपुरा, मालेगाव) वाहन घेऊन येताना दिसला.

त्याला थांबण्याचा इशारा केल्यावर वाहन रस्त्याच्या कडेला लावून तो पसार झाला. वाहनाच्या तपासणीत ९४ हजारांचा गुटखा व तीन हजारांचा तंबाखू असा एकूण ९७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dhule Crime : वार्सा फाट्यावर 97 हजारांचा गुटखा जप्त; पिंपळनेर पोलिसांची कारवाई
Dhule Crime News : इच्छेविरुद्ध गर्भपात करताना युवतीचा मृत्यू; डॉक्टरसह दोघांविरोधात गुन्हा दाखल

अधिक तपासात पथकाने मोहम्मद मोमीन याला शुक्रवारी (ता. २५) सायंकाळी ताब्यात घेतले. अन्न व औषध प्रशासनातील सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक एस. हृषीकेश रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे, पिंपळनेर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली बी. जी. शेवाळे, रवींद्र सूर्यवंशी, सोमनाथ पाटील, नरेंद्र माळी, श्री. मालचे, श्री. शिरसाट यांनी ही कारवाई केली.

Dhule Crime : वार्सा फाट्यावर 97 हजारांचा गुटखा जप्त; पिंपळनेर पोलिसांची कारवाई
Badnapur Crime : जवसगाव शिवारात युवकाचा खून; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()