Hanuman Jayanti 2023 : धुळ्यात ‘जय हनुमान’चा जयघोष!

Shri Panchmukhi Hanuman Temple.
Shri Panchmukhi Hanuman Temple. esakal
Updated on

धुळे : श्री हनुमान जयंतीनिमित्त येथील शिवाजी रोडवरील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात गुरुवारी (ता. ६) जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या हस्ते महाआरती झाली. (hanuman jayanti 2023 celebrated with great enthusiasm dhule news)

शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या कार्यक्रमावेळी ‘जय हनुमान’चा जयघोष झाला. श्री हनुमान मंदिरात दर्शनासाठी गर्दी, तर भंडाऱ्यातून महाप्रसादाचे वाटप झाले. श्री हनुमान जयंतीनिमित्त शहरात काही ठिकाणी बुधवारी (ता. ५) रात्री बाराला आतषबाजी करण्यात आली.

श्री हनुमान मंदिरामध्ये गुरुवारी पहाटेपासूनच पंचामृत अभिषेक, मंत्रोच्चार, हनुमान चालीसा पठणासह महाआरती करण्यात आली. नंतर ठिकठिकाणी भाविकांना महाप्रसादाचे वाटप झाले. सायंकाळी शहरातील अनेक हनुमान मंदिरांमध्ये महाप्रसादाचे आयोजन होते.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Shri Panchmukhi Hanuman Temple.
Unseasonal Rain Crop Damage : अवकाळी पावसामुळे सध्या कांदा वाफ्यातच सडण्याच्या मार्गावर!

शहरात पांझरा नदीकिनारी शिवाजी रोडवरील पंचमुखी हनुमान मंदिरात दुपारी बाराला जिल्हाधिकारी शर्मा आणि पोलिस अधीक्षक बारकुंड यांच्या हस्ते महाआरती झाली. पुजारी शर्मा, उद्योजक संदीप अग्रवाल, ओम खंडेलवाल, सुनील अग्रवाल, कमलाकर पाटील, अनिल संचेती, सत्यजित शिसोदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संगीता राऊत व भाविक उपस्थित होते.

शहरातील गल्ली क्रमांक दोनमधील लालबाग मारुती, देवपूरमधील उत्तरमुखी मारुती, पांजरपोळ येथील मारुती मंदिर, ऊस गल्लीतील दक्षिणमुखी मारुती यासह विविध मंदिरांमध्ये दिवसभर दर्शनासाठी गर्दी होती. दर्शनानंतर असंख्य भाविकांनी हनुमान चालीसा, संकटमोचन हनुमानाष्टक, भीमरूपी स्तोत्राचे पठण केले. अनेक मंदिरांमध्ये छप्पन्न भोग दाखविण्यात आला. महाप्रसादात मसालेभात, बुंदी, पुरी, भाजी, शेव, मठ्ठ्याचा समावेश होता.

Shri Panchmukhi Hanuman Temple.
Citylinc Electric Bus : शहरात लवकरच धावणार 50 इलेक्ट्रिक बस!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()