Christmas 2023 : नाताळनिमित्त ख्रिश्‍चन बांधवांमध्ये ‘आनंदपर्वणी’; आज विविध कार्यक्रमांची रेलचेल

नाताळनिमित्त शहरातील मुख्य चर्चसह ख्रिश्‍चन बांधवांचे घरे-बंगले विद्युत रोषणाईने झगमगट आहे.
The main church of the city was illuminated with electricity on the occasion of Christmas.
The main church of the city was illuminated with electricity on the occasion of Christmas.esakal
Updated on

Christmas 2023 : नाताळनिमित्त शहरातील मुख्य चर्चसह ख्रिश्‍चन बांधवांचे घरे-बंगले विद्युत रोषणाईने झगमगट आहे. दोन दिवसापासून नाताळनिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल शहर व जिल्ह्यात सुरू झाली आहे.

शाळा-महाविद्यालयामध्येही नाताळनिमित्त सांताक्लॉज अवतरत त्यांनी विद्यार्थ्यांसह सणाचा आनंद लुटला.(happiness among Christian brothers on occasion of Christmas festival nandurbar news)

ख्रिसमस हा भगवान येशूंचा जन्मदिवस. दोन दिवसापासून ख्रिश्‍चन बांधवांचा घरात आनंदपर्वणी अवतरली आहे. शाळा, महाविद्यालयांमध्येही नाताळनिमित्त विविध सांस्कृतिक कायर्क्रमांचा माध्यमातून नाताळचे महत्त्व पटवून दिले जात आहे. नंदुरबार येथील मिशन हायस्कूलमध्ये नाताळनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.

नृत्य करताना सांताक्लॉज विद्यार्थ्यांमध्ये जाऊन अभिवादन करत हात मिळविले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. संस्थेचे पदाधिकाऱ्यांसह शिक्षक वृंद व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन मुख्याध्यापिका नूतनवर्षा वळवी यांनी केले.

मुलांमध्ये आनंद वाटत फिरणारे सांताक्लॉज.
मुलांमध्ये आनंद वाटत फिरणारे सांताक्लॉज.esakal
The main church of the city was illuminated with electricity on the occasion of Christmas.
Christmas 2023 : यंदाच्या ख्रिसमस पार्टीला असा करा मेकअप लूक, दिसाल आकर्षक

मिशन शाळेत सार्वजनिक संगीत, गीतगायन कार्यक्रम व स्नेहभोजनाचा कार्यक्रम रात्री पार पडला. बंधूभाव जोपासत या कार्यक्रमात शहरातील विविध धर्मातील नागरिक,प्रतिष्ठीत व्यक्तींनी उपस्थिती दिली.

नाताळनिमित्त सोमवारी (ता.२५) सकाळी येथील चर्चमध्ये सामुहीक प्रार्थना होईल. रेव्ह.पठारे हे यावेळी समाजबांधवाना मार्गदर्शन करतील.

The main church of the city was illuminated with electricity on the occasion of Christmas.
Christmas 2023 : नाताळनिमित्त धुळ्यात बाजारपेठ फुलली; भेटवस्तूंची रेलचेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()