धडगाव (जि. नंदुरबार) : डाकिणीच्या (Witch) संशयावरून महिलेला विवस्त्र करून छळ करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. व्हिडिओतील बोली भाषेवरून तो व्हिडिओ जळगाव परिसरातील असल्याचेही बोलले जात आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याचे समोर आल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत ‘अनिस’ (Andhashraddha Nirmoolan Samiti) ने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर धडगाव पोलिसात सातपुड्यातील त्या अज्ञात दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात उत्साहात आंबेडकर यांची जयंती (Babasaheb Ambedkar Jayanti) साजरी करीत असताना धडगाव -मोलगी, अक्कलकुवा परिसरात महिलेला डाकीणीच्या संशयावरून नग्न करून तिचा छळ करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओतील भाषा समजून घेतली असता सदर व्हिडिओ हा व्हॉट्सअपवर (whatsapp) सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत पोचला असून व्हिडिओत एका महिलेला डाकिण असल्याच्या कारणावरून विवस्त्र करून त्रास देत असल्याचा दिसत असून हा व्हिडिओ कुठला आहे, याचा शोध सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. ह्या व्हिडिओत सदर महिलेला जाब विचारत असून ‘तुझ्यासह किती डाकीण आहेत, किती जणांना खाल्लं?’ असे प्रश्न विचारत धमकी देत असून महिलेच्या आजूबाजूला काही युवक चटके देण्याचे प्रयत्न करून त्रास देत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर ‘अनिस’ च्या कार्याध्यक्ष सुमित्रा वसावे यांनी राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांच्याकडे माहिती देऊन पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा शाखेकडून पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन सदर व्हिडिओ चा शोध घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली असून अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी ठोस पावले उचलावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
दोन अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल
दरम्यान, या प्रकरणी हा व्हिडिओ सातपुड्यातील असल्याचे बोलले जात आहे. त्यातील महिलेचा छळ गंभीर प्रकार आहे. त्याची दखल नंदुरबार जिल्हा पोलिसांनी घेतली आहे. व्हिडिओवरून धडगाव पोलिस ठाण्यात छळ करणाऱ्या दोन अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.