Dhule Bribe News : अक्कलकोस (ता. शिंदखेडा) येथील आदिवासी प्रकल्प विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापिकेने चार हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
निवृत्ती शिक्षकाचे गटविमा रकमेचे बिल अदा करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच मागितली होती. (Headmistress of ashram school arrested for taking bribe of 4 thousand Rs Dhule Bribe crime)
१ जानेवारीला सायंकाळी सातच्या सुमारास अक्कलकोस (ता. शिंदखेडा) येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्पाच्या शासकीय आदिवासी आश्रमशाळेच्या पटांगणात निवृत्त शिक्षक राजेंद्र चौधरी (वय ५८, रा. आनंदनगर, दोंडाईचा) यांचे गटविमा रकमेचे बिल अदा करण्यासाठी मुख्याध्यापिका अर्चना बापूराव जगताप यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली होती.
गटविम्याच्या रकमेचे देयक बिल शिंदखेडा उपकोशागार कार्यालयात सादर करावयाचे होते. तडजोडीअंती चार हजार रुपयांची मागणी ठरली. सोमवारी (ता. १) लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक रूपाली खांडवा यांच्याकडे निवृत्त शिक्षक चौधरी यांनी तक्रार केली.
त्यानुसार सापळा रचून १ जानेवारीला सायंकाळी सातच्या सुमारास अक्कलकोस आश्रमशाळेत मुलींच्या वसतिगृहासमोर झाडाखाली पंचांसमोर चार हजार रुपयांची लाच मुख्याध्यापिका अर्चना जगताप यांनी स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या निरीक्षक रूपाली खांडवा यांनी ही कारवाई केली.
दोंडाईचा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक रूपाली खांडवा पुढील तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.