Dhule News : मनपाच्या ‘आरोग्य’मध्ये धुसफूस! अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, जबाबदाऱ्यांतून नाराजी

Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporationesakal
Updated on

धुळे : महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात सध्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या याअनुषंगाने अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये धुसफूस असल्याचे समजते. अशा धुसफुशीमुळेच शहरातील स्वच्छतेसह विविध अभियानांतील कामांत अडथळे येत असल्याचेही सांगितले जाते.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांकडूनही याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे काही तक्रारी गेल्याचे समजते. त्यामुळे आरोग्य विभागात सर्वकाही आलबेल आहे अशी स्थिती नाही. धुळे शहर व महापालिकेच्या ‘आरोग्या’साठी ही बाब निश्‍चितच चांगली नाही. त्यामुळे यातून मार्ग काढण्याची गरज आहे. (health department of dhule municipality in problem Resentment from appointments responsibilities of officers Dhule News)

महापालिकेचा आरोग्य विभाग त्यातही शहर स्वच्छतेची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे नागरिकांसह पदाधिकारी, अधिकाऱ्यांचे लक्ष असते. सर्वाधिक व्यस्त असलेला हा विभाग गणला जातो.

अगदी स्वच्छताच नव्हे तर महापालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या विविध कामांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाते. शहरातील समस्या, प्रश्‍नांच्या मालिकेतही हा विभाग अग्रस्थानी असतो. त्यामुळे या विभागाकडे सर्वांचेच लक्ष असते.

दरम्यान, सध्या या विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे. विविध कारणांनी या विभागातील अधिकारी व आयात तसेच शैक्षणिक पात्रता नसलेल्या पण अधिकार दिलेल्या अधिकाऱ्यांमध्ये सूर जुळत नसल्याचे सांगितले जाते. त्याचा कामावरही परिणाम होत आहे.

मूळचे अधिकारी बाहेर

मनपाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात शैक्षणिक पात्रता, अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांना दूर सारून इतर विभागातील तसेच शैक्षणिक योग्यता कमी असताना बॉस बनवून ठेवल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या विभागामार्फत होणाऱ्या विविध कामांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.

जे अधिकारी मूळचे त्याच विभागाचे आहेत, त्यांनी त्यासंबंधी कोर्सेस पूर्ण केले आहेत, अनेक वर्षांचा अनुभव आहे. अशा अधिकाऱ्यांकडे विभागाच्या प्रमुखाची जबाबदारी न देता इतर विभागांतील अधिकाऱ्यांना डोक्यावर बसवून ठेवल्याने या अधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

Dhule Municipal Corporation
Agni Veer Recruitment | ‘अग्निवीर’साठी नोंदणी करा : जिल्हाधिकारी शर्मा

काहींच्या अट्टाहासापायी समस्या

प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीतल्या व्यक्तीकडे सार्वजनिक आरोग्य विभागाची जबाबदारी देण्याच्या अट्टाहासापायी मूळ विभागातल्या अधिकाऱ्यांना डावलून इतरांना संधी दिल्याचे सांगितले जाते.

या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा प्रकार का केला याबाबतही विविध कारणे सांगितली जातात. या मनमानीमुळे मात्र आता अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये धुसफूस वाढत असल्याचे सांगितले जाते.

पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी

शैक्षणिक योग्यता नसलेल्यांना महत्त्वाच्या पदांवर बसविले गेल्याचा मुद्दा नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांकडूनही उपस्थित झाल्याचे दिसते. नवनिर्वाचित महापौर प्रतिभा चौधरी यांनीही आढावा बैठकीत हा मुद्दा मांडला होता.

अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत एका पदाधिकाऱ्याने तर आयुक्तांनाही पत्र दिल्याचे समजते. शिवाय एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही हा मुद्दा आयुक्तांकडे मांडून चांगली टीम नेमण्याचा आग्रह धरल्याची माहिती आहे.

अभियान, मोहिमांवर परिणाम

विभागातील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, जबाबदाऱ्यांच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांमध्ये होणारी धुसफूस, तक्रारी ही बाब महापालिकेसह शहरासाठी चांगली नाही. स्वच्छता अभियान, स्वच्छ सर्वेक्षण, माझी वसुंधरा, विविध प्रकल्पांचे काम यावर केंद्र, राज्य सरकारांचे विशेष लक्ष आहे.

अधिकाऱ्यांमधील धुसफुशीचा परिणाम त्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वेळीच पदाधिकारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालण्याची गरज आहे.

Dhule Municipal Corporation
Bhopal Dog Show : नाशिक शहर पोलिसांचा ‘गुगल’ ठरला Best Dog! दुसऱ्यांदा सन्मान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.