Leopard Attack News : बिबट्याच्या हल्ल्यातील मृत बालकाच्या नातेवाइकांना मदत; दहा लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द

Vanyavehir: MLA Amshya Padavi while handing over a check of 10 lakhs to the relatives of a child killed in a leopard attack
Vanyavehir: MLA Amshya Padavi while handing over a check of 10 lakhs to the relatives of a child killed in a leopard attackesakal
Updated on

Nandurbar News : बिबट्याने हल्ला करून ठार केलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा पुनर्वसन येथील सुरेश भाईदास वसावे या बालकाच्या वारसांना वन विभागातर्फे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते दहा लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

नुकतेच देवमोगरा पुनर्वसनच्या शेतशिवारात अंगणात खेळत असताना अचानकपणे बिबट्याने हल्ला करून सुरेश भाईदास वसावे या बालकाला फरपटत नेत शरीराचे लचके तोडून त्याला जागीच ठार केले होते. (Help to relatives of dead child in leopard attack MLA Amsha Padvi handed over a check of ten lakh rupees Nandurbar News )

Vanyavehir: MLA Amshya Padavi while handing over a check of 10 lakhs to the relatives of a child killed in a leopard attack
Water Supply News : जळगावात आज होणार पाणीपुरवठा

घटनेची माहिती मिळताच विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी घटनास्थळी धाव घेत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून परिसरातील शेतात मृत बालकाचा शोध घेतला होता.

त्यानंतर स्वतः ग्रामीण रुग्णालयात जाऊन बालकाचे शवविच्छेदन करून अधिकाऱ्यांना अहवाल शासनास पाठविण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, बालकाच्या वारसांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी यासाठी आमदार आमश्या पाडवी यांनी वेळोवेळी शासन आणि प्रशासन स्तरावर पाठपुरावा केला.

त्यामुळे वन विभागातर्फे सुरेश वसावे या बालकाच्या वारसांना वन विभागाने तत्काळ २० लाख रुपये भरपाई म्हणून मंजूर केले आहेत. त्यानुसार देवमोगरा पुनर्वसन येथील ग्रामपंचायत कार्यालयात आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते दहा लाख रुपयांचा धनादेश बालकाच्या वारसांना देण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Vanyavehir: MLA Amshya Padavi while handing over a check of 10 lakhs to the relatives of a child killed in a leopard attack
Jalgaon Temperature News : जळगाव जिल्ह्यात तापमान पुन्हा 44 अंशांकडे

या वेळी सुरेश वसावेचे वडील भाईदास न्हाल्या वसावे व आई नोवीबाई भाईदास वसावे यांनी दहा लाख रुपयांचा धनादेश स्वीकारला.

या वेळी तळोदा वन विभागाचे उपवनसंरक्षक एल. एम. पाटील, अक्कलकुव्याचे वनक्षेत्रपाल ललित गवळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक काना नाईक, देवमोगरा पुनर्वसन येथील सिंमजी नाईक, जयंती पाडवी आदी उपस्थित होते.

या वेळी आमदार आमश्या पाडवी, उपवनसंरक्षक लक्ष्मण पाटील यांनी ग्रामस्थांना वन्य हिंस्त्र प्राण्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन करत शेतकऱ्यांनी आपल्या शेतशिवारात एकटे न जाता सोबत कोणाला तरी न्यावे व जोरजोरात आवाज करत रस्त्याने जावे तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामस्थांनी घराच्या अंगणात किंवा शेतशिवारात बाहेर झोपू नये, असे आवाहन केले. शेतकऱ्यांनी स्वतःसोबत आपल्या परिवाराची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Vanyavehir: MLA Amshya Padavi while handing over a check of 10 lakhs to the relatives of a child killed in a leopard attack
Jalgaon KBCNMU News : पदोन्नतीसाठी पेपर सेटिंग, मूल्यांकनात सहभाग अनिवार्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.