Dhule News : आमदारांनी शौचालय पाडले, धुळ्यात गरिबांची घरे तोडली; हिरामण गवळी यांचा आरोप

Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporationesakal
Updated on

Dhule News : शहराचे आमदार फारूक शाह यांचे घर अतिक्रमणात आहे. ते नूतनीकरणासाठी त्यांनी वडजाई रोड येथील मनपा मालकीचे सार्वजनिक शौचालय, गरिबांची घरे तोडली.

तसेच घरासाठी कंपाउंड वॉल करून जागा ताब्यात घेतली, असा गंभीर आरोप मनपा महासभेत बुधवारी भाजपचे नगरसेवक हिरामण गवळी यांनी केला. या प्रकरणी त्यांच्या मागणीनुसार चौकशीअंती गुन्हा दाखल करावा, जागा ताब्यात घेण्याचा आदेश महापौर प्रतिभा चौधरी यांनी यंत्रणेला दिला. (Hiraman Gawli allegations on MLA about demolishing poor houses in dhule municipality news)

महासभेत श्री. गवळी यांनी महापौरांना निवेदन देत आमदार शाह यांच्यावर गंभीर आरोप केले. आमदार मनमानी करताहेत. मनपाचे सार्वजनिक शौचालय, गोरगरिबांची घरे त्यांनी तोडून टाकली. जागेला कंपाउंड वॉल केले आहे. आमदारांचे स्वतःचे घर मात्र अतिक्रमणात आहे. शौचालय तोडल्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होईल. या प्रकरणी कारवाई करावी, नुकसानभरपाई घ्यावी, अशी मागणी श्री. गवळी यांनी केली.

तुमचे आमदारावरून जुंपली

श्री. गवळी यांनी अल्पसंख्याक भागातील नगरसेवकांना उद्देशून तुमचे आमदार शौचालय तोडतात, अशी टिप्पणी केली. त्यावर नगरसेवक साबीर शेठ, अमीन पटेल यांनी आक्षेप घेत आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभागृहात काही वेळ गोंधळ निर्माण झाला. या मुद्द्यावर श्री. गवळी व साबीर शेठ, अमीन पटेल यांच्यात जुंपल्याचेही पाहायला मिळाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dhule Municipal Corporation
Dhule News : कचरा फेकल्यास, कॅरिबॅग वापरल्यास दंड : उपायुक्त डॉ. नांदूरकर

सर्वाधिक निधी आणला

साबीर शेठ यांनी शहराचा आमदार सर्वांचा असतो, असे म्हणत गेल्या ७० वर्षांत कुणी आणला नाही एवढा निधी आमदार शाह यांनी आणल्याचे सांगितले. त्यावरूनही सत्ताधारी भाजप व साबीर शेठ यांच्यात जुंपली. अमीन पटेल यांनीही शाह शहराचे आमदार असल्याचे सांगितले.

महासभेत ‘ते’ विषय तहकूब

मनपातील औषधनिर्माताच्या मंजूर व रिक्त पदांवर कार्यरत कर्मचाऱ्यांना सामावून घेणे तसेच एका वर्ग-४ रोजंदारी कर्मचाऱ्याला कायम सेवेत घेण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचा विषय तहकूब करण्यात आला. हे दोन्ही विषय मला दाखविले गेलेले नाहीत. तसेच एनयूएचएमची पदे अशा पद्धतीने सामावून घेणे नियमाला धरून नाही, त्यामुळे तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविता येणार नाही, असे आयुक्त अमिता दगडे-पाटील यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे या दोन्ही विषयांबाबत आयुक्तांमार्फत प्रस्ताव यावा, असे म्हणत महापौरांनी विषय तहकूब केले. दरम्यान, औषधनिर्माता पदावरील पाच कर्मचारी सेवेत सामावून घेण्याबाबत शासन जो निर्णय घेईल तो घेईल पण महासभेने तसा ठराव मंजूर करावा, अशी आग्रही मागणी अमीन पटेल यांनी मांडली.

Dhule Municipal Corporation
Dhule News : धुळे जिल्ह्यात 17 पासून ‘आयुष्मान भव’ पंधरवडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.