शहादा (जि. नंदुरबार) : शहादा शहरातील ग्लॅडर्स आजाराने बाधित घोडा (Horse) आढळला आहे. त्याचे नमुने रोग निदानासाठी रोग अन्वेषण विभाग औंध पुणे येथे पाठविले होते. त्यांनी ते अनुसाधन केंद्र हिसार (हरियाना) येथे पाठवले होते. त्याचा अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याने पशुवैद्यकीय विभाग सतर्क झाले. (horse in Shahada infected with Glanders disease nandurbar news)
शहादा येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांनी एक अहवाल सादर केला आहे. त्यात हे स्पष्ट झाले असून या घोड्याची विल्हेवाट लावण्यासाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी गोस्वामी नियोजन करत आहे. हा आजार सांसर्गिक व मानवास संक्रमित होणारा आहे. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींना, ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा सूचना करण्यात आल्या आहेत.
येथील पंचायत समितीची सर्वसाधारण सभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सभापती वीरसिंग ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. ३१) झाली. यावेळी सभेत अजेंड्यावरील आठ विषय तसेच, ऐनवेळी आलेल्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी विविध विभागातील प्रमुख उपस्थित होते.
तालुका कृषी अधिकारी, वीज वितरण कंपनी, प्रादेशिक परिवहन मंडळ, ग्रामीण पाणीपुरवठा, लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषदेतील विविध विभागांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांनी सभेचे प्रास्ताविक केले.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
यावेळी बांधकाम उपअभियंता श्री. पावरा, शाखा अभियंता हरिषचंद्र भोई, शाखा अभियंता श्री. जडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. गोस्वामी, बालविकास प्रकल्प अधिकारी रजिंत कुर्हे, विस्तार अधिकारी श्री. बेलदार, लेखा विभागाचे विनोद ठाकरे, कनिष्ठ सहाय्यक नरेंद्रसिंग गिरासे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री. सिसोदिया आदी उपस्थित होते.
शिक्षण विभागात पदे रिक्त
यावेळी सदस्या रोहिणी पवार यांनी पिंप्री येथील पाणीपुरवठा पूर्ववत करावा, येत्या काही दिवसात उन्हाळा तीव्र होण्याची शक्यता पाहता उपाययोजना करून पाणी प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली. सदस्य सुदाम पाटील यांनी अनेक अंगणवाड्यांना अद्यापही गॅस व खेळणी तसेच, इतर साहित्य मिळाले नाही.
त्याची लवकरात अंमलबजावणी करावी. वाघरडे जिल्हा परिषद शाळेची इमारतीची दुरवस्था असून इमारतीचे बांधकाम करावे. शिक्षण विभागात अनेक पदे रिक्त आहेत. ते वरिष्ठ कार्यालयास पाठपुरावा करून भरावे, जिल्हा परिषद शाळेत गरिबांचे मुले शिकतात श्रीमंतांची शिकत नाही असे सुदाम पाटील यांनी सभागृहात सांगितले. तर आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस द्या असे गटविकास अधिकारी श्री. घोरपडे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.