Nandurbar News : फलोत्पादन विकास अभियानातील योजनांचा लाभ घ्या; येथे करा ऑनलाइन अर्ज..

Nandurbar News : फलोत्पादन विकास अभियानातील योजनांचा लाभ घ्या; येथे करा ऑनलाइन अर्ज..
esakal
Updated on

नंदुरबार : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन हा घटक राबविण्यात येत आहे.

या घटकात विदेशी फळे, फुले, मसाला लागवड व आंबा, चिकू, संत्रा, मोसंबी या फळपिकांच्या जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी लाभ देण्यात येणार आहे. (Horticulture Development Campaign appeal to apply through online mode on website nandurbar news)

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी https://mahadbtmahait. gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फुले घटकांत कट फ्लॉवर्ससाठी अल्पभूधारक शेतकऱ्यास एक लाख प्रतिहेक्टर खर्चमर्यादेत एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल ४० हजार प्रतिहेक्टर अनुदान, तर इतर शेतकऱ्यास एकूण खर्चाच्या २५ टक्के किंवा कमाल २५ हजार प्रतिहेक्टर अनुदान देण्यात येईल.

कंदवर्गीयासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यास एक लाख ५० हजार प्रतिहेक्टर खर्चमर्यादेत एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल ६० हजार प्रतिहेक्टर अनुदान, तर इतर शेतकऱ्यास एकूण खर्चाच्या २५ टक्के किंवा कमाल ३७ हजार ५०० प्रतिहेक्टर अनुदान देण्यात येईल.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

Nandurbar News : फलोत्पादन विकास अभियानातील योजनांचा लाभ घ्या; येथे करा ऑनलाइन अर्ज..
NMC News : LED दिव्यांचा लखलखाट पोचला लाखावर! पावणेदोन कोटी रुपयांची बचत

सुटी फुलेसाठी अल्पभूधारक शेतकऱ्यास ४० हजार प्रतिहेक्टर खर्चमर्यादेत एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल १६ हजार प्रतिहेक्टर अनुदान, तर इतर शेतकऱ्यास एकूण खर्चाच्या २५ टक्के किंवा कमाल १० हजार प्रतिहेक्टर अनुदान देण्यात येईल.

मसाला पीक लागवड घटकात बियावर्गीय व कंदवर्गीय मसाला पिकासाठी शेतकऱ्यास ३० हजार प्रतिहेक्टर खर्चमर्यादेत एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल १२ हजार प्रतिहेक्टर अनुदान, तर बहुवर्षीय मसाला पिकासाठी शेतकऱ्यास ५० हजार प्रतिहेक्टर खर्चमर्यादेत एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल २० हजार प्रतिहेक्टर अनुदान देण्यात येईल.

फळांसाठीही अनुदान

Nandurbar News : फलोत्पादन विकास अभियानातील योजनांचा लाभ घ्या; येथे करा ऑनलाइन अर्ज..
Dhule News : जिल्हा कोशागारात साडेतीन हजार देयकांचा निपटारा; 3 सेकंदांच्या विलंबामुळे 1 कोटीचा निधी परत!

विदेशी फळपीक लागवड घटकात ड्रॅगनफ्रूट, अंजीर व किवी फळासाठी शेतकऱ्यास चार लाख प्रतिहेक्टर खर्चमर्यादेत एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल एक लाख ६० हजार प्रतिहेक्टर अनुदान, तर स्ट्रॉबेरी फळासाठी शेतकऱ्यास दोन लाख ८० हजार प्रतिहेक्टर खर्चमर्यादेत एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल एक लाख १२ हजार प्रतिहेक्टर अनुदान तसेच पॅशनफ्रूट,

ब्युबेरी, तेंदुफळ व अवॅकॅडो फळासाठी शेतकऱ्यास एक लाख प्रतिहेक्टर खर्चमर्यादेत एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल ४० हजार रुपये अनुदान देण्यात येते. जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी शेतकऱ्यास ४० हजार प्रतिहेक्टर खर्चमर्यादेत खर्चाच्या ५० टक्के व जास्तीत जास्त २० हजार रुपये प्रतिहेक्टर अनुदान देण्यात येते.

या घटकांचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

Nandurbar News : फलोत्पादन विकास अभियानातील योजनांचा लाभ घ्या; येथे करा ऑनलाइन अर्ज..
Dhule News : वर्षभर लागणारी यंत्रसामग्री खरेदी न करण्याचा प्रश्‍न; भाडेतत्त्वाचा प्रकार केवळ पोसण्यासाठी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.