Dhule News : येथील मिल परिसरातील माजी नगरसेविका माधवी नेमाणे यांच्या घरावर दगडफेकप्रकरणी संशयित तिघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
या प्रकरणी श्रीमती नेमाणे (वय ७०, रा. राऊळवाडी, चितोड रोड, धुळे) यांनी फिर्यादीत म्हटले आहे, की त्या शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास क्रांती चौकातून घराकडे जात होत्या. (house of former councillor case has been registered against three people in connection with stone pelting Dhule Crime News)
तेव्हा त्यांना संशयित राहुल गजानन थोरात ऊर्फ टाल्या, सचिन कोळवले ऊर्फ भुऱ्या आणि बबुवा कंदारे (सर्व रा. राऊळवाडी) यांनी रस्त्यात अडवून पैशांची मागणी केली.
नकार दिला असता तिघांनी श्रीमती नेमाणे यांच्या मागे येत, त्यांच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करीत पुन्हा पैशांची मागणी केली.
नकार दिल्याच्या रागातून संशयित तिघांनी श्रीमती नेमाणे यांच्या घरावर दगडफेक केली. घरातील संसारोपयोगी वस्तू अस्ताव्यस्त फेकल्या. त्यानुसार संशयित तिघांवर गुन्हा दाखल झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील तपास करीत आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.