Dhule News : आदिवासी वसतिगृहाचे गृहपाल सक्तीच्या रजेवर; एका सोहळ्यात विद्यार्थिनी रेस्टॉरंट- बारमध्ये

bar
bar esakal
Updated on

Dhule News : पिंपळनेर (ता. साक्री) येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील गृहपाल पल्लवी हिरालाल जाधव यांनी त्यांच्या मुलीचा वाढदिवस पिंपळनेर येथील एका रेस्टॉरंट- बारमध्ये साजरा केला. त्यासाठी वसतिगृहातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

या प्रकरणी तक्रार झाल्यावर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाने गृहपाल जाधव यांच्या गैरवर्तनामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे.(Housekeeper of tribal hostel on compulsory leave dhule news )

चौकशी होईपर्यंत गृहपाल जाधव सक्तीच्या रजेवर असतील. या गंभीर विषयाकडे सामाजिक कार्यकर्ते तानाजी बहिरम, प्रेमचंद सोनवणे,

मन्साराम भोये, पुष्पा चौधरी, गणेश गावित, अजय राऊत, किरण पवार, संजय ठाकरे, राम ठाकरे, दिलीप माळी आदींनी शासनाचे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले, की आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह पिंपळनेरला आहे.

त्यात गुरुवारी (ता. २) ७५ विद्यार्थिनी क्षमता असलेल्या या वसतिगृहातील गृहपाल जाधव यांनी त्यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त पार्टी ठेवली. ती पिंपळनेर येथील एका नामांकित रेस्टारंट व बारमध्ये ठेवली.

bar
Dhule Crime News : पोलिसांनी पकडलेले संशयित निघाले सराईत गुन्हेगार; मराठवाड्यात तब्बल 25 गुन्हे

शासकीय नियमावलीचे उल्लंघन करून सायंकाळी साडेसात ते रात्री साडेआठपर्यंत आदिवासी वसतिगृहातील सर्व ७५ मुली, कर्मचारी शासकीय आवार सोडून रेस्टारंट व बारमध्ये उपस्थित होते. दोन विद्यार्थिनी प्रवेशद्वारात स्वागतासाठी होत्या.

या लाजीरवाण्या प्रकाराची माहिती मिळताच आदिवासी सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी उपस्थित झाले. या प्रकरणी आदिवासी विकासमंत्री व आदिवासी आयुक्तांनी दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.

चौकशीअंती कारवाई : पटेल

सहाय्यक प्रकल्प अधिकारी एस. एस. पटेल म्हणाले, की अशा गैरवर्तणुकीबद्दल गृहपाल जाधव यांच्यावर कारवाईसंदर्भात अहवाल प्राप्त झाला आहे. चौकशीच्या अधीन राहून गृहपाल जाधव यांना शुक्रवार (ता. ३)पासून पुढील आदेशापर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. चौकशीअंती व मुलींचे जाबजबाब घेतल्यावर, तसेच पुरावे संकलनातून नेमके काय- काय घडले, ते तपासून दोषींवर कारवाईचा अंतिम निर्णय घेतला जाईल.

bar
Dhule News : अतिक्रमणधारकांनी स्वतःहून हटविली अतिक्रमणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.