HSC Result 2023 : शिरपूर 95.70 टक्क्यांमुळे टॉपर; मुली ठरल्या अव्वल

Maharashtra HSC Result 2023
Maharashtra HSC Result 2023 esakal
Updated on

Dhule News : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २१ फेब्रुवारी ते २१ मार्चदरम्यान झालेल्या बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल गुरुवारी (ता. २५) दुपारी जाहीर झाला. जिल्ह्याचा यंदा सरासरी ९२.२९ टक्के निकाल लागला. (hsc result 2023 average result of district this year was 92 29 percent dhule news)

यात ३५ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला. चार तालुक्यांपैकी शिरपूर तालुक्याचा सर्वाधिक ९५.७० टक्के, तर धुळे तालुक्याचा तुलनेत कमी ८९.९५ टक्के निकाल लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात घट झाली. मुलांपेक्षा मुली उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे.

जिल्ह्यातून बारावीच्या नियमित २३ हजार ६३८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यात १३ हजार ४८५ मुले आणि १० हजार १५३ मुलींचा समावेश होता. पैकी १३ हजार ३४८ मुले आणि १० हजार ६५ मुली, असे एकूण २३ हजार ४१३ विद्यार्थी प्रविष्ट झाले. परिक्षेत २१ हजार ६०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात १२ हजार १०४ मुले (९०.६८ टक्के), तर ९ हजार ५०४ मुली (९४.४२ टक्के) उत्तीर्ण झाल्या आहेत. सरासरी दोन हजार ६३३ परीक्षार्थी गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

शाखा, तालुकानिहाय स्थिती

जिल्ह्यात विज्ञान शाखेतील ९७.२४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेतून ८४.४२ टक्के, वाणिज्य शाखेचे ९५.३१ टक्के, तर व्यवसाय अभ्यासक्रमाचे ८६.३१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुनर्परीक्षार्थींचा निकाल ५५.७१ टक्के लागला आहे. त्यात धुळे तालुका ५५.१०, साक्री ६१.२९, शिरपूर ८०.९५, शिंदखेडा ५६.८६ आणि धुळे शहरी भागाचा ४५.७१ टक्के निकाल लागला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Maharashtra HSC Result 2023
विद्यार्थांसाठी महत्त्वाची बातमी! बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया येत्या सोमवारपासून होणार सुरू HSC Result 2023

तालुकानिहाय गुणवत्तेत उत्तीर्ण परीक्षार्थींची संख्या (कंसात शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या) अशी : धुळे- २२७ (५), साक्री- ३७५ (५), शिरपूर- १४१२ (१७), शिंदखेडा- २७३ (३) आणि धुळे शहरी भाग- ३४६ (३५). विद्यार्थ्यांना २६ मेपासून पाच जूनपर्यंत गुण पडताळणीसाठी अर्ज करता येईल. उत्तर पत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी २६ मे ते १४ जूनदरम्यान ऑनलाइन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहेत.

तालुकानिहाय निकाल (टक्के)

* शिरपूर : ९५.७०

* साक्री : ९३.३४

* धुळे शहर : ९२.३९

* शिंदखेडा : ९०.७२

* धुळे : ८९.९५

उत्तीर्ण परीक्षार्थी (टक्के)

तालुका......... मुले ........ मुली

* धुळे............८८.३४ .....९२.३२

* साक्री..........९१.७९......९५.४६

* शिरपूर.........९४.३८......९७.३९

* शिंदखेडा.......८८.४७......९३.६९

* धुळे शहर.......९१.०९......९३.९५

* एकूण............९०.६८ .....९४.४२

Maharashtra HSC Result 2023
HSC Result: वडिलांनीच जाहीर केला मुलीचा बारावीचा निकाल! नेमका काय घडलाय हा दुर्मिळ क्षण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.