धुळे : राज्याचे पाचवे शक्तीपीठ खानदेशची कुलस्वामीनी श्री एकवीरादेवी व रेणुका माता मंदिर ट्रस्टतर्फे शारदीय नवरात्रोत्सव साजरा होत आहे. यानिमित्त जनकल्याणासाठी शतचंडी याग होम हवनाद्वारे सोमवारी (ता. ३) पूर्णाहुती झाली. तसेच मंगळवारी घरगुती स्थापन झालेले घट विसर्जन होईल. या पार्श्वभूमीवर मंदिरात शेकडो भाविकांची दर्शनासाठी गर्दी उसळली.(Huge crowd at Ekvira Devi temple dhule latest news)
श्री एकवीरादेवी मंदिरात सोमवारी आठव्या माळेला शेकडो भाविकांनी दर्शन घेतले. सकाळपासूनच दर्शनासाठी रांग लागली. अलोट गर्दी आणि उकाड्यामुळे अनेकांना लांबूनच दर्शन घ्यावे लागले.
सकाळी आठनंतर मंदिराच्या आवारात पाय ठेवायलाही जागा नव्हती. सकाळी नऊपासून होम हवन आणि शतचंडी यज्ञाला सुरवात झाली. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सण- उत्सवाला निर्बंध होते. ते शिथील झाल्याने शहरासह जिल्ह्यात नवरात्रोत्सव जल्लोषात होत आहे.
श्री एकवीरादेवी मंदिर व इतर सर्व मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासह नवस फेडण्यासाठी गर्दी केली आहे. श्री एकवीरादेवी मंदिर दर्शनासाठी चोवीस तास खुले आहे. रविवारी आणि सोमवारी अष्टमीला महत्त्व असल्याने मंदिरात अलोट गर्दी झाली.
मोठ्या पुलापर्यंत वाहनांची रांग लागली. भाविकांना दर्शनसाठी तासनतास वाट पाहावी लागली. भाविकांनी नारळ, प्रसाद, ओटी, फुलहार अर्पण केला. या परिसरात गर्दीमुळे लाखोंची उलाढाल झाली. जिल्हा पोलिस दल, होमगार्ड, सुरक्षा रक्षक तसेच देवपूर पोलिसांकडून बंदोबस्त तैनात आहे.
म्हसदीतील धनदाईदेवीच्या दर्शनासाठी रिघ
म्हसदी : अष्टमीनिमीत्त सकाळपासून खानदेशातील भाविकांची मोठी गर्दी केली होती. सोमवार असतानाही अष्टमीचे पावित्र्य जपत भाविकांनी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम करत कुलदैवत धनदाईदेवीस आहेर, शृंगार चढविला.न वरात्रोत्सवानिमित्त गेल्या आठवड्यापासून विविध अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी धनदाईदेवीच्या महाआरतीत सहभाग घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.