Dhule Crime News : शिंदखेडा तालुक्यात गौणखनिजाचे अवैध उत्खनन; महसूलच्या काहींच्या ‘मिलीभगत’चा आरोप

Dhule Crime News : शिंदखेडा तालुक्यात गौणखनिजाचे अवैध उत्खनन; महसूलच्या काहींच्या ‘मिलीभगत’चा आरोप
Updated on

Dhule News : शिंदखेडा तालुक्यात तापी, बुराई, पांझरा नदीपात्रातून अवैध वाळू व मुरमाचे अवैध उत्खनन व अवैध वाहतूक दिवसा व रात्री बिनबोभाट सुरू असून, यात गौणखनिज माफियांशी महसूल विभागातील काही अधिकारी व कर्मचारी यांच्याशी ‘मिलीभगत’ असल्याचा आरोप शिंदखेडा पंचायत समितीचे माजी सदस्य विजयसिंह राजपूत यांनी केला आहे.

शिंदखेडा तालुक्यातून तापी, बुराई, पांझरा आदी प्रमुख नद्या वाहतात. या नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन व अवैध वाहतूकही मोठ्या प्रमाणावर होत असल्याने नदीकाठावरील गावांना आतापासून पिण्याच्या पाण्याची टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. (Illegal mining of minor minerals in Shindkheda taluka dhule news)

महसूल विभागाने आतापासून वाळूमाफियांवर कारवाई केली नाही तर उन्हाळ्यात तालुक्यातील निम्म्या गावांना पिण्यासाठी व शेतीच्या सिंचनासाठी पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.

मुरमाचे अवैध उत्खनन

वाळूसोबत आता तालुक्यात नवीन ‘क्रेझ’ मुरमाचे अवैध उत्खनन व अवैध वाहतुकीचा धंदा तेजीत आहेत. पोटखराब जमिनीवरील मुरूम मातीमोल घेऊन अव्वाच्या सव्वा भावात विकला जात असल्याने गौणखनिज माफियांना गोरख धंदा सापडला आहे.

शिंदखेडा गावशिवरातील बिनशेती गट क्रमांक ४०२ पैकी प्लॉट क्रमांक ४ या सुभाष भानुदास तलवारे व देवीदास नारायण अमृतकर यांच्या मालकीच्या सामाईक प्लॉटमध्ये अंदाजे सुमारे तीन ब्रास माती मुरमाचा अनधिकृत साठा आढळल्याचा पंचनामा शिंदखेडा महसूल मंडळ अधिकारी रोहिदास कोळी, शिंदखेडा शहर तलाठी मनोज गोसावी, भडणे तलाठी बी. एस. कोळी व पाटण तलाठी आर. एस. सय्यद यांनी केला आहे.

Dhule Crime News : शिंदखेडा तालुक्यात गौणखनिजाचे अवैध उत्खनन; महसूलच्या काहींच्या ‘मिलीभगत’चा आरोप
Dhule News : रुग्णांनी फिरविली पाठ; अधिकाऱ्यांविना बिघडलंय निमगूळ आरोग्य केंद्राचं स्वास्थ्य..!

वाळूमाफियांनवर वचक कोणाचा?

शिंदखेडा तालुक्यातील वाहणाऱ्या प्रमुख नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन व अवैध वाहतुकीत तरुण पिढी मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली आहे. रात्री-अपरात्री कारवाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात येत असल्याने महसूल विभाग वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत आहे.

"शिंदखेडा तालुक्यात गौणखनिजाचे अवैध उत्खनन व अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. महसूल विभाग डोळ्यावर पट्टी बांधून असल्याच्या भूमिकेत आहे. तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे सुटीच्या दिवशी मुख्यालयी थांबत नसल्याने एखादी गंभीर घटना घडली तर याला जबाबदार कोण. तहसीलदार सपकाळे जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेत असतील तर त्यांच्या पश्चात कोणत्या अधिकाऱ्यांकडे कार्यभार असेल ते जनतेला माहिती असले पाहिजे." -विजयसिंह राजपूत, माजी पंचायत समिती सदस्य, शिंदखेडा

Dhule Crime News : शिंदखेडा तालुक्यात गौणखनिजाचे अवैध उत्खनन; महसूलच्या काहींच्या ‘मिलीभगत’चा आरोप
Dhule Crime News : चोरट्यांनीच ‘त्याला’ पाजले पाणी; घाबरू नका, चाव्या द्या.. सांगत 4 घरे फोडली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.