Dhule Crime News : शिंदखेड्यात अवैध वाळू वाहतुकीचा ट्रॅक्टर जप्त; 4 दिवसांनंतर गुन्हा दाखल

Illegal sand transport tractor seized in Shindkhedi
Illegal sand transport tractor seized in Shindkhediesakal
Updated on

Dhule News : धांदरणे-नरडाणा रस्त्यावर बुधवारी (ता. २७) महसूल विभाच्या भरारी पथकला ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करताना मिळाल्याने तो ट्रॅक्टर रात्रीच शिंदखेडा तहसील कार्यालयात जमा करण्यात आला होता.

त्याच रात्री मालकाने तहसील कार्यालयाच्या गेटचे कुलूप तोडून पळवून नेला होता. (Illegal sand transport tractor seized in Shindkheda dhule news)

मंगळवारी (ता .३०) तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात पत्र देऊनही चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. याबाबत मंगळवारी (ता. ३) ‘सकाळ’मध्ये ‘शिंदखेडा तालुक्यात वाळूमाफियांची दबंगगिरी’ अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी ट्रॅक्टरमालक व चालकाविरुद्ध चार दिवसांनंतर चोरीचा गुन्हा दाखल केला.

शिंदखेडा शहर महसूल मंडळ अधिकारी रोहिदास कोळी यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की शिंदखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या गौणखनिज चोरी करणाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करावी व त्यासाठी तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली पथक नेमण्यात आले असून, पथकात शिंदखेडा शहर मंडळ अधिकारी रोहिदास कोळी, रंजाणे मंडळ अधिकारी अशोक भामरे, विरदेल मंडळ अधिकारी एन. एस. माळी, खलाणे मंडळ अधिकारी नीलेश मोरे यांची पथकात नेमणूक करण्यात आली आहे.

Illegal sand transport tractor seized in Shindkhedi
Nashik Crime News : पीडित युवतीच्या मृत्यूनंतर संशयिताचीही आत्महत्या; दिंडोरी तालुक्यातील घटना

बुधवारी रात्री नऊच्या सुमारास धांदरणे गावाच्या शिवारात पेट्रोलिंग करीत असताना रात्री पावणेदहाच्या सुमारास धांदरणे-नरडाणा रस्त्यावर विनाक्रमांकाचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर (डीएल ४७ आयएक्स) व त्याच्यासोबत लाल रंगाच्या ट्रॉलीमध्ये अंदाजे एक ब्रास वाळू भरून येत असताना दिसले.

त्यास थांबवून ट्रॅक्टरचालकास वाळू वाहतुकीच्या परवान्याची विचारणा केली असता त्याने वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याचे सांगितले. तसेच त्यास त्याचे नाव, गाव विचारले असता त्याचे नाव हेमकांत संजय ठाकरे (वय २९, रा. कदाणे, ता. शिंदखेडा) असे असल्याचे सांगितले. ट्रॅक्टर ताब्यात घेऊन शिंदखेडा तहसील कार्यालयाच्या आवारात रात्री दहा वाजून ४० मिनिटांनी जप्त करण्यात येऊन मुख्य गेटला कुलूप लावण्यात आले होते.

Illegal sand transport tractor seized in Shindkhedi
Mumbai Crime : प्रसिद्ध गोल्डन मॅनला पोलिसाकडून मारहाण; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

रात्री बारा ते एकच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या मुख्य दरवाजाला लावलेले कुलूप तोडून ट्रॅक्टर चोरून घेऊन गेले. गुरुवारी (ता. २८) सकाळी तहसील कार्यालयात पाहिले असता रात्री पकडलेला ट्रॅक्टर दिसला नाही म्हणून खात्री झाली की ट्रॅक्टरमालक-चालक हेमकांत ठाकरे याने तो नेला आहे.

पाच लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर व चार हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू असा एकूण पाच लाख चार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. मालक-चालक ठाकरे याच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार एकलाख पठाण तपास करीत आहेत.

Illegal sand transport tractor seized in Shindkhedi
Nashik Crime News : पीडित युवतीच्या मृत्यूनंतर संशयिताचीही आत्महत्या; दिंडोरी तालुक्यातील घटना
Illegal sand transport tractor seized in Shindkhedi
Jalgaon Crime News : कजगावात शेतकऱ्याला लुटण्याचा प्रयत्न; दरोड्यानंतरची घटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.