चिमठाणे (जि. धुळे) : अक्कडसे (ता.शिंदखेडा) शिवारातील तापी नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन (illegal sand mining) व अवैध वाहतूक (illegal transportation) करताना शुक्रवारी (ता.२४) भरदुपारी साडे तीन वाजेच्या सहा ट्रॅक्टर अवैध वाळू उत्खनन व अवैध वाहतूक करताना महसूल विभागाला (Revenue Department) मिळून आले. मात्र दोन ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले तर चार ट्रॅक्टर चालक पळवून जाण्यास यशस्वी झाले आहेत. सहा ट्रॅक्टर मालक व सहा चालकांविरोधात शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Illegal sand transportation in Akkadse area 2 tractors in seized Dhule Crime News)
नरडाणा महसूल मंडळ अधिकारी संजय जगताप यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मंडळ अधिकारी संजय जगताप, दीपक ईशी, आनंद वाघ, शिवपूरी गोसावी, हेमंत लोंढे, सुभाष पाटील, चंद्रकांत पाटील, मनोज साळवे, किशोर बडगुजर, विजय सोनवणे पथकाने अक्कडसे गावशिवरातील तापी नदी पात्रात कारवाई केली. त्याठिकाणी सहा ट्रॅक्टर वाळूने भरुन निघत असताना चालकाला त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता दोन ट्रॅक्टर सापडले, तर चार ट्रॅक्टरचालक पळून गेलेत. पकडलेल्या ट्रॅक्टरचा मालक कल्पेश परदेशी (रा. पाटण) व दुसऱ्या ट्रॅक्टरचा मालक चेतन साळुंके (रा.नेवाडे ) ट्रॅक्टर ताब्यात घेतले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.