Nandurbar News : नेटवर्क साठी धरली उंच टेकड्यांची वाट..!

नंदुरबार जिल्ह्यात सध्या समुदाय आरोग्याधिकारी, आशा गटप्रवर्तक, आरोग्य कर्मचाऱ्यांकडून आयुष्यमान कार्ड काढण्याचे काम करण्यात येत आहे.
Officials and staff concerned taking advantage of the high hills to locate the network
Officials and staff concerned taking advantage of the high hills to locate the networkesakal
Updated on

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात सध्या समुदाय आरोग्याधिकारी, आशा गटप्रवर्तक, आरोग्य कर्मचाऱ्यांकडून आयुष्यमान कार्ड काढण्याचे काम करण्यात येत आहे. मात्र सातपुड्याच्या दुर्गम भागात नेटवर्कअभावी या कामात अडथळा येत आहे.

यावर उपाय म्हणून धडगाव तालुक्यात नेटवर्कसाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून चक्क उंच टेकड्यांचा आधार घेण्यात येत आहे. दरम्यान, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाचे व कार्यतत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. (In Dhadgaon taluka high hills are being supported by concerned officials and employees for network nandurbar news)

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, तळोदा, अक्कलकुवा या तालुक्यांतील विशेषतः सातपुड्याच्या दुर्गम भागातील लहान पाड्यांमध्ये आजही नेटवर्कअभावी ऑनलाइन कामात अडथळा निर्माण होत असतो.

मात्र कार्यतत्परता, अथक परिश्रम यांच्या जोरावर संबंधित अधिकारी व कर्मचारी आलेल्या समस्यांवर मार्ग शोधत असतात आणि आपापले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतात. सध्या धडगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तेलखेडींतर्गत उपकेंद्र गोरांबांतर्गत समुदाय आरोग्याधिकारी, आशा, गटप्रवर्तक यांच्याकडून त्यांच्या भागातील लाभार्थ्यांचे आयुष्यमान कार्ड काढणे सुरू आहे.

मात्र अनेक ठिकाणी नेटवर्क नसल्याने त्यांच्याकडून सातपुडा पर्वतरांगेत असलेल्या उंच टेकडीचा सहारा घेण्यात येत आहे. उंच टेकडीवर ज्या ठिकाणी नेटवर्क मिळेल तेथे जाऊन लाभार्थ्यांचे आयुष्यमान कार्ड काढण्याचे काम संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

अधिकाऱ्यांचे कौतुक

जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. कांतिलाल पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या धडगाव तालुक्यात समुदाय आरोग्याधिकारी, आशा, गटप्रवर्तक, कर्मचारी यांच्याकडून आयुष्यमान कार्ड काढण्याचे काम सुरू असून, पायपीट करून उंच टेकडीवरील नकट्यादेव, अस्तंबा येथे जाऊन त्या ठिकाणी समक्ष लाभार्थ्यांना बसवून त्यांच्यासोबत सेल्फी घेऊन ऑनलाइन डाटा अपलोड करण्यात येत आहे.

Officials and staff concerned taking advantage of the high hills to locate the network
Nandurbar News : महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी मदत : डॉ. विजयकुमार गावित

गोरगरीब नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी मोठ्या दवाखान्यांमध्ये जाणे परवडणारे नसल्याने शासनाकडून या योजनेंतर्गत मोफत पाच लाखांपर्यंत उपचार मिळणार असल्याचे पटवून या भागातील लाभार्थ्यांना सांगण्यात येत आहे.

यामुळे परिसरातील ग्रामस्थांना या योजनेचे महत्त्व कळले असून, त्यांच्याकडून वेळात वेळ काढून आपले आयुष्यमान कार्ड काढण्यास प्राधान्य दिले जात आहे. दरम्यान, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या परिश्रमाचे व कार्यतत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Officials and staff concerned taking advantage of the high hills to locate the network
Nandurbar News : सीलबंद औषधांमध्ये निघतेय अळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.