Dhule Water Shortage : जिल्ह्यात 302 गावांसह 39 वाड्यांना टंचाईची झळ!

जिल्ह्यात पुढील वर्षात ३०२ गावे व ३९ वाड्यांना टंचाईची झळ बसण्याची शक्यता आहे.
water-shortage
water-shortageesakal
Updated on

Dhule Water Shortage : जिल्ह्यात या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने अनेक गावे, वाड्या-वस्त्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागेल अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नऊ कोटी ७६ लाखांचा टंचाईचा आराखडा तयार केला आहे.

जिल्ह्यात पुढील वर्षात ३०२ गावे व ३९ वाड्यांना टंचाईची झळ बसण्याची शक्यता आहे. टंचाई आराखड्यात ३४४ उपाययोजनांचा समावेश केला आहे. (In dhule district 302 villages and 39 palaces are facing water shortage news)

जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पावसाचे प्रमाण कमी राहिले. परतीच्या पावसानेही पाठ फिरविली. जिल्ह्यात सरासरी ५३५.१० मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना ४३३.७० मिलिमीटर अर्थात सरासरीच्या तुलनेत ८१.१० टक्के पाऊस झाला.

त्यामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून अशा तिमाहीसाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्या संयुक्त आढाव्यानंतर प्रशासनाने टंचाई आराखडा तयार केला आहे.

त्यानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर या पहिल्या तिमाहीत शिंदखेडा व साक्री तालुक्यांतील १६८ गावे, एका वाडीत टंचाईची शक्यता आहे. जानेवारी ते मार्चदरम्यान शिरपूर वगळता जिल्ह्यातील उर्वरित तीन तालुक्यांतील ७२ गावे, चार वाड्यांमध्ये तर एप्रिल ते जून या तीन महिन्यात संपूर्ण जिल्ह्यात ६२ गावे व ४० वाड्यांत पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होण्याची शक्यता आहे.

water-shortage
Dhule Marathon 2024 : पोलिस कवायत मैदानावर उद्या धुळे मॅरेथॉन; निरामय लोकोत्सव

दरम्यान, शिंदखेडा तालुक्यात सप्टेंबरपासूनच टंचाईची छळ बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. तालुक्यातील डाबली गावाला टँकरने पाणीपुरवठा होत आहे, तर ३० गावांमध्ये विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत.

२६ गावांचे मूळ जलस्रोत आटले

उन्हाळ्यात जलसाठ्यातील पाण्याचे बाष्पीभवन गतीने होते. जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांतदेखील चांगला जलसाठा नाही. सद्य:स्थितीत सर्व सिंचन प्रकल्पांत ५० टक्के साठा शिल्लक आहे. ऐन हिवाळ्यात जिल्ह्यात पहिला टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली. डाबली (ता. शिंदखेडा) गावात सध्या टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

तसेच इतर ३० गावांसाठी विहिरींचे अधिग्रहण केले आहे. जिल्ह्यातील २६ गावांचे मूळ जलस्रोत आटल्याने या गावांमध्ये विहीर अधिग्रहणाचा पर्याय प्रशासनाला शोधावा लागला आहे. यात शिंदखेडा तालुक्यात सर्वाधिक २२ गावांत, तर साक्री व धुळे तालुक्यांत प्रत्येकी दोन गावांमध्ये विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे.

water-shortage
Dhule Ajit Pawar News : ‘अक्कलपाडा’ धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी प्रयत्न : उपमुख्यमंत्री अजित पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.